मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Fighter: इंडिया ऑक्यूपाईड पाकिस्तान; अंगावर शहारे आणणारा 'फायटर'चा ट्रेलर पाहिलात का?

Fighter: इंडिया ऑक्यूपाईड पाकिस्तान; अंगावर शहारे आणणारा 'फायटर'चा ट्रेलर पाहिलात का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 15, 2024 04:04 PM IST

Fighter Trailer: हृतिक रोशन आणि दीपिका पादूकोण महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या 'फायटर' या चित्रपटाचा ट्रेलर सध्या चर्चेत आहे.

Fighter Trailer
Fighter Trailer

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण ही जोडी पहिल्यांदाच एकत्र चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्या चित्रपटाचे नाव 'फायटर' असे आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील एक सीन चर्चेत होता. या सीनमध्ये दीपिका आणि हृतिकची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळाली. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

'फायटर' चित्रपटाच्या ३ मिनिटे ९ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला दाखवण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये भारताचे जवान शहिद होतात. त्यामुळे इंडियन एअर फोर्सया सगळ्याचा बदला घेण्यासाठी जातात. फायटर पाकिस्तान्यांना धडा शिकवण्यासाठी निघतात. हृतिक रोशन यावेळी 'POK म्हणजे पाकिस्तान ऑक्यूपाइड कश्मीर.. तुम्ही कब्जा केला आहे पण मालक आम्ही आहोत' हा डायलॉग मारताना दिसतो. दीपिका देखील इंडियन एअर फोर्समध्ये कार्यरत असते. हृतिक आणि दीपिका रिलेशनशीपमध्ये असतात. मात्र, देशासाठी लढत असताना हृतिक दीपिकाशी असलेले नाते तोडतो. आता त्यांची नेमकी काय असेल लव्हस्टोरी हे चित्रपट पाहिल्यावर कळणार आहे.
वाचा: १२ दिवसांनंतर मॉडेल दिव्याचा मृतदेह सापडला; मर्सिडिज कारमध्ये लपवून कॅनॉलमध्ये फेकला

प्रेक्षकांना 'फायटर' चित्रपटाचा ट्रेलर पसंतीला पडत आहे. एका यूजरने ट्रेलर पाहून 'हा ट्रेलर नाही एका भारतीयाच्या मनातील भावना आहेत' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'हा खरा चित्रपट आहे. पहिल्याच दिवशी चित्रपट १०० कोटी रुपये कमावतो की नाही पाहा' असे म्हटले आहे.

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने 'फायटर' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात दीपिका आणि हृतिकसोबत अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर, अक्षय ओबेरॉय, संजीदा शेख महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

WhatsApp channel