Fighter Day 7 Box Office : 'फायटर'ला लागले ग्रहण! कमाईत ५० टक्के घसरण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Fighter Day 7 Box Office : 'फायटर'ला लागले ग्रहण! कमाईत ५० टक्के घसरण

Fighter Day 7 Box Office : 'फायटर'ला लागले ग्रहण! कमाईत ५० टक्के घसरण

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Feb 01, 2024 01:23 PM IST

Fighter Box Office One Week Collection: पाठोपाठ आलेल्या तीन सुट्ट्यांमुळे 'फायटर' चित्रपटाला चांगला नफा मिळाला होता. पण आता चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Fighter Trailer
Fighter Trailer

Hritik Roshan and Deepika Padukone: 'पठाण' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचा ‘फायटर’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन, दीपिका पादूकोण, अनिल कपूर आणि करण सिंह ग्रोवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. देशाच्या वायू दलाने केलेल्या कामगिरीवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. लागोपाठ आलेल्या सुट्ट्यामुळे चित्रपटाला चांगला नफा झाला होता. पण आता चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचे पाहायला मिळते.

जगभरातून 'फायटर' या चित्रपटाने दोनशे कोटींपेक्षा अधिक कमाई केली असेल पण सध्या बॉक्स ऑफिसवर फायटरचे विमान डगमगताना दिसत आहे. पहिल्या चार दिवसांत या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र सध्या त्याच्या कमाईच्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास दिवसागणिक हा चित्रपट बॉक्स ऑफिसच्या कमाईच्या आकड्यात खाली येताना दिसतो आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 'फायटर' चित्रपटाच्या कमाईत जवळपास ५० टक्के घट झाली आहे. सातव्या दिवशी केवळ ६.३५ कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
वाचा: ‘गंगुबाई काठियावाडी’मधील अभिनेत्याची झाली फसवणूक, बँक अकाऊंट झाले हॅक

चित्रपटाच्या कमाईत ५० टक्के घसरण

'फायटर' हा चित्रपट गुरुवारी म्हणजेच २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्या दिवशी २२.५० कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी ४०.११ कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या दिवशी २८ कोटींहून अधिक गल्ला जमावला. चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. चित्रपटाने २८.५ कोटी रुपयांची कमाई केली. पाचव्या दिवशी १९-२० कोटी रुपये कमावले आहेत. सहाव्या दिवशी चित्रपटाने ६.३५ कोटी रुपये कमावले आहेत.

फायटरचे कलेक्शन

भारतातून नेट कलेक्शन - १४०.३५ कोटी

ग्रॉस कलेक्शन - १६०.८ कोटी

मीडिया रिपोर्टनुसार, 'फायटर'चे डिजिटल अधिकार नेटफ्लिक्सने खरेदी केले आहेत. ‘फायटर’चे डिजिटल अधिकार कोट्यावधींमध्ये विकले गेले असले, तरी त्यातून निर्मात्यांना नेमके किती पैसे मिळाले? ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. 'फायटर' थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ५६ दिवसांनी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पादूकोण, अनिल कपूर आणि करण सिंह ग्रोवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा आठवा चित्रपट आहे. व्हिजुअल इफेक्ट्स, कंप्यूटर ग्राफिक्स इमेजिंगमध्ये मास्टर आहे. आता या चित्रपटाची ओटीटीवर प्रदर्शित होण्याची सर्वजण वाट पाहात आहेत.

Whats_app_banner