गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पादूकोण महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'फायटर' हा चित्रपट चर्चेत आहे. भारतने वायू दलाच्या मदतीने पाकिस्तानमधचे बेस कॅप्ट उद्धवस्त केले होते. यावर आधारित हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाला लागोपाठ आलेल्या तीन सुट्ट्यांमुळे चांगला फायदा झाला आहे. प्रधर्शनाच्या चार दिवसातच चित्रपटाने १०० कोटी रुपयांचा आकडा पार केल्याची माहिती समोर आली आहे.
'फायटर' हा चित्रपट गुरुवारी म्हणजेच २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्या दिवशी २२.५० कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी ४०.११ कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या दिवशी २८ कोटींहून अधिक गल्ला जमावला. चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. चित्रपटाने २८.५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाने एकूण ११८ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाची कमाई पाहाता येत्या काही दिवसांत चित्रपट १५० कोटी कमावेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
वाचा: 'या' आठवड्यात हे चित्रपट आणि वेबसीरिज होणार रिलीज
मीडिया रिपोर्टनुसार, 'फायटर'चे डिजिटल अधिकार नेटफ्लिक्सने खरेदी केले आहेत. ‘फायटर’चे डिजिटल अधिकार कोट्यावधींमध्ये विकले गेले असले, तरी त्यातून निर्मात्यांना नेमके किती पैसे मिळाले? ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. 'फायटर' थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ५६ दिवसांनी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पादूकोण, अनिल कपूर आणि करण सिंह ग्रोवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा आठवा चित्रपट आहे. व्हिजुअल इफेक्ट्स, कंप्यूटर ग्राफिक्स इमेजिंगमध्ये मास्टर आहे