Hrithik Roshan pashmina roshan: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याची चुलत बहीण पश्मीना रोशन नुकतीच चित्रपटात झळकली आहे. तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. बहिणीला मोठ्या पडद्यावर पाहून हृतिक रोशनने तिचे तोंडभरून कौतुक केले आहे. पश्मीनाचा पहिला चित्रपट'इश्क विश्क रिबाउंड' पाहिल्यानंतर हृतिक खूप प्रभावित झाला. यानंतर त्याने पश्मीनासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि सोबतच एक भावनिक संदेश लिहिला आहे. आपल्या या सोशल मीडिया पोस्टमध्ये हृतिकने पश्मीनाच्या प्रचंड क्षमतेचे कौतुक केले आणि तिचे भविष्य खूप उज्ज्वल असल्याचे म्हटले आहे.
हृतिक रोशनने पश्मीनावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आणि लिहिले की, ती भविष्यात खूप काही साध्य करेल, विशेषत:'इश्क विश्क रिबाउंड' मधील तिचे पदार्पण खूप चांगले आहे. हृतिक पुढे म्हणाला की, पश्मीनाची एक खास शैली आहे, जी त्याला माहित आहे आणि ती जर तिला स्वतःलाही समजली तर, ती आपली ही शैली आणखी वाढवू शकेल. हृतिकच्या या पोस्टनंतर पश्मीनावर सोशल मीडियातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिला तिच्या उज्वल भविष्यासाठी चाहतेही शुभेच्छा देत आहेत.
पश्मीना रोशनच्या पहिल्याच चित्रपटाची सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा होती. अभिनेता शाहिद कपूर याच्या ‘इश्क-विश्क’ या चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या'इश्क विश्क रिबाउंड' या चित्रपटातून पश्मीना रोशन हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिच्या या चित्रपटाबद्दल हृतिक रोशन देखील खूप उत्सुक होता. पश्मीनाला तिच्या पदार्पणाबद्दल शुभेच्छा देताना तिच्या लाडक्या डुग्गू भैय्याने म्हणजेच हृतिक रोशन याने एक पोस्ट लिहीली होती. हृतिक रोशनने या पोस्टमध्ये लिहिले की, 'पश्मीना, मला तुझा खूप अभिमान वाटतो आहे. तुझ्या मेहनतीमुळे तू इथपर्यंत पोहोचली आहेस. तुझी हीच चमक आणखी वाढताना पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. तुझी इच्छाशक्ती तुला खूप पुढे घेऊन जाईल.’
पश्मीना रोशन ही रोशन लाल नागरथ यांची नात, राकेश रोशन यांची भाची, राजेश रोशनची मुलगी आणि हृतिक रोशनची चुलत बहीण आहे. राकेश रोशन यांचे धाकटे बंधू राजेश रोशन हे व्यवसायाने भारतीय संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार आहेत. त्यांनी ७०च्या दशकापासून बॉलिवूडमध्ये आपली कारकीर्द सुरू केली आहे. फिल्मफेअरने त्यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कारही प्रदान केला आहे. त्यांची लेक अभिनेत्री पश्मीना ही एक ट्रेन बॉलिवूड क्लासिकल डान्सर आहे. ती तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेते. तिचे अनेक फोटो ती तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते.