हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार अभिनेता म्हणून हृतिक रोशन ओळखला जातो. तो सतत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून हृतिक गायक आणि मॉडेल सबा आझादला डेट करताना दिसत आहे. गुरुवारी हृतिक गर्लफ्रेंड सबा आझादसोबत पार्टी करताना दिसला. यादरम्यान असं काही घडलं की हृतिक संतापला आहे. त्याचा चिडलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हृतिक रोशन 'फायटर' चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांची पत्नी ममता आनंद यांच्या पार्टीत पोहोचला होता. दरम्यान, मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे हृतिक गाडीतून उतरला आणि पटकन शेडखाली जाऊन उभा राहिला. जेव्हा पॅपराझींनी हृतिकला पाहिलं तेव्हा त्यांनी त्याचा फोटो काढण्यासाठी त्याला चारही बाजूंनी घेरलं. या कारमध्ये हृतिकची गर्लफ्रेंड सबादेखील आहे हे पॅपराझींना माहित नव्हते.
जेव्हा सबा गाडीतून उतरली तेव्हा तिला पावसात भिजावे लागले. कारण पॅपराझींनी हृतिक भोवती गर्दी केली होती. तिला शेडपर्यंत पोहोचण्यास मार्ग नव्हता. हृतिकने जेव्हा हे पाहिले तेव्हा तो पळत सबाकडे गेला. पण पॅपराझींची गर्दी पाहून हृतिक चिडला. त्याचवेळी पॅपराझींनी हृतिक आणि सबा यांची माफी मागायला सुरुवात केली.
शेड खाली गेल्यावर हृतिक थोडा शांत झाला. तो पॅपराझींना काहीच बोलला नाही. त्याने गर्लफ्रेंड सबा आणि मित्र कुणाल कपूरसोबत फोटोसाठी पोझ दिल्या. त्यानंतर तो आत निघून गेला. दरम्यान, सबाने पांढऱ्या रंगाचा सॅटनीचा शर्ट परिधान केला आहे. त्यावर राखाडी रंगाची पँट घातली आहे. कानात आणि हातात सोनारी रंगाची ज्वेलरी घातली आहे. तर हृतिकने सबाला मॅचिंग पांढरा शर्ट आणि आत राखाडी रंगाचा टी-शर्ट घातला आहे. त्यावर राखाडी रंगाची पँट घातली आहे.
वाचा: भर मांडवात राणी मुखर्जीवर चिडली काजोल, फटका मारतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल
हृतिक लवकरच 'वॉर २' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी दिसणार आहेत. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.