बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल म्हणून हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्याकडे पाहिले जायचे. पण हृतिकने सुझानला घटस्फोट देत सर्वांना चकीत केले. घटस्फोटानंतर दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. सुझान अर्सलन गोणीला डेट करत आहे तर हृतिक रोशन सबा आझादला. दरम्यान, सुझान खानने बॉयफ्रेंड अर्सलनच्या वाढदिवशी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टवर हृतिक रोशनने देखील कमेंट केली आहे. घटस्फोटानंतरही हृतिक आणि सुझानचे मैत्रिचे नाते पाहून सर्वजण चकीत होताना दिसतात.
सुझानने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अर्सलनसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघे एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत सुझानने, "मला आयुष्यात जर काही हवं असेल तर तो तू आहेस. हॅप्पी बर्थ डे माय डार्लिंग. तू मला जगातील सर्वात आनंदी स्त्री बनवले आहेस. मी दररोज प्रार्थना करते आणि आशा करते की यापुढील काळ हा आपला सर्वोत्तम काळ असेल. आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस सुरू होतील आणि ते कायमचे असतील. माझे तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे" या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
सुझानची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टवर हृतिकने कमेंट करत, 'हॅप्पी बर्थडे माय फ्रेंड' असे म्हटले आहे. अर्सलनने हृतिकचे आभारही मानले आहेत. या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी अर्सलनला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर हृतिकच्या चाहत्यांच्या कमेंट्सही दिसत आहेत. एकाने लिहिले की, "हृतिकला हेवा वाटावा म्हणून ती हे सर्व करत आहे का? एकाने हृतिकच्या कमेंटवर लिहिलं की, "हे सांगायला खूप मोठं मन लागतं." आणखी एक टिप्पणी अशी आहे की, ते निरोगी नात्यात आहेत. काही लोक लिहित आहेत की अर्सलान हृतिकसारखा दिसतो.
वाचा: अभिनेत्याच्या मृत्यूला पत्नीने नाना पाटेकरांना ठरवले होते जबाबदार, नेमकं काय घडलं होतं?
हृतिकच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा फायटर या चित्रपटात दिसला होता, ज्यात दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते. मात्र, या चित्रपटाला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. आता तो वॉर २ मध्ये दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर देखील असणार आहे.
संबंधित बातम्या