Hrithik Roshan And Saba Azad Viral Photo: बॉलिवूड कोरिडॉरमध्ये सध्या अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री सबा आझाद या जोडीची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही महिन्यापासून हृतिक रोशन सबा आझाद हिला डेट करत आहे. पत्नी सुझान खान हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर आता हृतिक सबाच्या प्रेमात पडला आहे. हृतिक सबाच्या प्रेमात इतका आकंठ बुडलाय की, अंबानींच्या शाही पार्टीत तो चक्क सबाच्या हिल्स हातात घेऊन फिरताना दिसला. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या ग्रॅंड ओपनिंगमध्ये ही जोडी एकत्र आली होती. या जोडीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. याच दरम्यान हृतिक रोशनचा एक नवा फोटो समोर आला आहे, जो पाहून चाहते सोशल मीडियावर त्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत. या फोटोमध्ये हृतिक एका व्यक्तीशी बोलताना दिसत आहे. यावेळी सगळ्यांचं लक्ष त्याच्या हाताकडे वेधलं गेलं. हृतिकने त्याची ‘लेडी लव्ह’ सबा हिची चप्पल हातात पकडली आहे.
प्रसिद्ध फॅशन डिझायनर अमित अग्रवाल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर नीता अंबानींच्या या पार्टीतील काही फोटो शेअर केले आहेत. यातील काही फोटोंमध्ये सबा त्यांच्यासोबत फोटो पोज देताना दिसली. तर, यातीलच एका फोटोमध्ये हृतिक देखील कैद झाला. या फोटोत हृतिक रोशन एका व्यक्तीशी बोलताना दिसत आहे. तर, त्याच्या हातात त्याने सबाच्या हाय हिल्स पकडल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा क्युट फोटो पाहून चाहते हृतिक आणि सबा यांच्या ‘कपल गोल्स’चे कौतुक करत आहेत.
हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या डेटिंगच्या चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये प्रचंड रंगत आहेत. हृतिकने २००० साली सुझेन खान सोबत लग्न केलं होतं. मात्र, २०१४ साली त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर हृतिक गेल्या काही महिन्यांपासून सबाला डेट करत आहे. सबा देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. एअरपोर्ट असो किंवा आउटिंग सबा आणि ह्रतिक सगळीकडे एकत्र जाताना दिसतात. तर, ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
संबंधित बातम्या