हृतिक रोशन गर्लफ्रेंड सबा आझादसोबत साजरी करतोय नात्याची ३ वर्षे, सुजान खान कमेंट करत म्हणाली...-hrithik roshan and saba azad celebrate third relationship anniversary sussanne khan comment ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  हृतिक रोशन गर्लफ्रेंड सबा आझादसोबत साजरी करतोय नात्याची ३ वर्षे, सुजान खान कमेंट करत म्हणाली...

हृतिक रोशन गर्लफ्रेंड सबा आझादसोबत साजरी करतोय नात्याची ३ वर्षे, सुजान खान कमेंट करत म्हणाली...

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 02, 2024 09:00 AM IST

Hritik Roshan Post: हृतिक रोशन आणि सबा आझाद हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. खरं तर दोघांनी एक पोस्ट केली आहे ज्यात दोघेही एकमेकांना नात्याला तीन वर्षे झाल्यामुळे शुभेच्छा देत आहेत.

Hritik Roshan
Hritik Roshan

बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन हा कायमच त्याच्या चित्रपटांसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. पहिली पत्नी सुजान खानला घटस्फोट दिल्यानंतर हृतिक सबा आझादला डेट करत आहे. बऱ्याच काळापासून ते दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करतात. आता हृतिकने सबासोबत एक नवीन फोटो शेअर केला आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तसेच या पोस्टवर हृतिकची पूर्व पत्नी सुजान खानने कमेंट केल्याने चर्चा रंगली आहे.

काय आहे हृतिकची पोस्ट?

हृतिकने इन्स्टाग्रामवर सबासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सबाने रेट्रो स्टाईल आउटफिट परिधान केला आहे. तर हृतिकने काळ्या रंगाचा टीशर्ट, पँट आणि टोपी घातली आहे. खरं तर या पोस्टमध्ये दोघेही हसत हसत कॅमेऱ्याकडे बघत आहेत. मात्र, या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हृतिकने हा फोटो शेअर करत, 'हॅप्पी एनिव्हर्सरी पार्टनर... १-१०-२०२४' असे कॅप्शन दिले आहे. तर सबानेही हाच फोटो शेअर करत लिहिले आहे की, 'हॅप्पी ३ इयर पार्टनर.'

हृतिकच्या एक्स वाईफने देखील केली कमेंट

या पोस्टवर अनेक सेलेब्स दोघांचे अभिनंदन करत कमेंट केल्या आहेत. पण दोघेही अॅनिवर्सरी का साजरी करत आहेत, याबाबत चाहते संभ्रमात पडले आहेत. मात्र, काहीजण असेही म्हणतात की, दोघेही ३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असावेत आणि दोघेही रिलेशनशिपची अॅनिवर्सरी साजरी करत असतील.हृतिकच्या पूर्वाश्रमीची पत्नी सुजैन खानने या पोस्टवर कमेंट केली आहे. सुजैनने या पोस्टवर “सुपर पिक!! हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी अशी कमेंट केली आहे. हृतिकची पुतणी पश्मीना रोशनने देखील या पोस्टवर कमेंट केली आहे. तिने “आह्ह, किती गोड!” असं लिहील आहे.

हृतिक आणि सबा बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. पण २०२२ मध्ये करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत हे दोघे ही एकत्र आले होते. त्यानंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची पुष्टी झाली होती. हृतिकने यापूर्वी सुझान खानसोबत लग्न केले होते, दोघांना दोन मुले आहेत. मात्र २०१४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
वाचा: ब्रेकअप करण्यासाठी मी दुसऱ्या मुलासोबत सेक्स करायचे; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

हृतिकच्या कामाविषयी

हृतिकच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा फायटर या चित्रपटात दिसला होता, ज्यात दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते. मात्र, या चित्रपटाला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. आता तो वॉर २ मध्ये दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर देखील असणार आहे.

Whats_app_banner
विभाग