Fighter Movie: हृतिक रोशन-दीपिका पदुकोणच्या ‘फायटर’ चित्रपटावर ‘या’ देशांत घातली बंदी! कारण काय?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Fighter Movie: हृतिक रोशन-दीपिका पदुकोणच्या ‘फायटर’ चित्रपटावर ‘या’ देशांत घातली बंदी! कारण काय?

Fighter Movie: हृतिक रोशन-दीपिका पदुकोणच्या ‘फायटर’ चित्रपटावर ‘या’ देशांत घातली बंदी! कारण काय?

Published Jan 24, 2024 02:14 PM IST

Fighter Movie Banned in Gulf Countries: ‘फायटर’ हा चित्रपट रिलीज होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र, आता चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा झटका बसला आहे.

Fighter Movie Banned in Gulf Countries
Fighter Movie Banned in Gulf Countries

Fighter Movie Banned in Gulf Countries: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता हृतिक रोशन यांचा ‘फायटर’ हा चित्रपट रिलीज होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीतही हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कामगिरी करत आहे. मात्र, चित्रपटाच्या काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने कात्रीही चालवली आहे. ‘फायटर’ चित्रपटाच्या ट्रेलरचे सर्वत्र कौतुक असताना काही देशांनी या चित्रपटावर बंदी घातली आहे.

आता चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा झटका बसला आहे. दुबई वगळता सर्व आखाती देशांमध्ये या ‘फायटर’ चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. गल्फ कोऑपरेशन काऊन्सिलमध्ये बहरीन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांचा समावेश आहे. यापैकी अनेक देशांमध्ये बॉलिवूड चित्रपटांना खूप पसंती दिली गेली आहे. पण, हृतिक आणि दीपिकाच्या ‘फायटर’ चित्रपटाला या देशांनी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. आता गल्फ देशांच्या या निर्णयामुळे निर्मात्यांना तोटा सहन करावा लागू शकतो. आखाती देशांनी टाकलेला हा बहिष्कार ‘फायटर’च्या निर्मात्यांसाठी मोठा धक्का आहे.

All The Best: मुक्या, बहिऱ्या अन् आंधळ्या मित्रांची धमाल कॉमेडी; रंगमंचावर पुन्हा होणार 'ऑल द बेस्ट'!

आखाती देशांमध्ये चित्रपटावर बंदी घालण्याचे मुख्य कारण म्हणजे ‘फायटर’ चित्रपटाचा विषय असल्याचे सांगितले जात आहे. ‘फायटर’ चित्रपटाच्या कथेत दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर पाकिस्तानवर हवाई हल्ला करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचं कथानक पुलवामा हल्ल्यावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच या चित्रपटाला प्रेक्षकांकडून आधीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, हा विषय आखाती देशांमध्ये दाखवला जाणार नाहीये.

‘फायटर’ हा चित्रपट भारतातील पहिला एरियल अ‍ॅक्शन चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण या नव्याकोऱ्या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. यासोबतच चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगही दमदार आहे. पहिल्या दिवशी ‘फायटर’ छप्परफाड कमाई करणार, असे म्हटले जात आहे. ‘फायटर’ चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच चाहत्यांमध्ये आणि बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची क्रेझ दिसू लागली आहे. हृतिक रोशनचा हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाऐवजी एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी प्रदर्शित होत आहे. जर, 'फायटर'ला अ‍ॅडव्हान्स बुकिंगप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळाला तर, बॉक्स ऑफिसवर पहिल्या ४ दिवसांतच १०० कोटी रुपये कमावण्याची अपेक्षा आहे. सध्या या चित्रपटाकडून सगळ्यांनाच खूप अपेक्षा आहेत.

Whats_app_banner