संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ओळखली जाते. महाराष्ट्राच्या घराघरांत हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा 'सहकुटुंब हसू या' म्हणत, प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचे काम अविरत करत आली आहे. सर्वाधिक लोकप्रिय हास्यमालिकेचा मान या कार्यक्रमाने पटकावला आहे. आता या लोकप्रिय कार्यक्रमात तुम्हाला सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. पण कशी? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा...
सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होते आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही नवे कलाकार, नेहमी नवनवीन स्कीट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता नवे पर्व, नवे विषय, नवनवीन स्कीट्स यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होते आहे. पण आता प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात चक्क सहभागी होता येणार आहे. हो तुम्ही अगदी बरोबर वाचत आहात. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात प्रेक्षकांना सहभागी होण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. त्यासाठी एका स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे नाव 'महाराष्ट्राची हास्यजत्रा - Talent Hunt' असे आहे. या स्पर्धेतेच्या विजेत्यांना चक्क महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत सहभागी होता येणार आहे.
वाचा: भर कार्यक्रमात अक्षय कुमारने दिला अभिनेत्रीच्या ड्रेसवर पाय अन्...; पाहा नेमकं काय झालं
'महाराष्ट्राची हास्यजत्रा - Talent Hunt' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रेक्षकांनी त्याचा एक ते दीड मिनिटांचा व्हिडीओ शूट करायचा आहे. हा व्हिडीओ शूट करुन सोनी लिव्ह या अॅपवर अपलोड करायचा आहे. या व्हिडीओमध्ये स्पर्धकांनी त्यांचे उत्तम टॅलेंट सादर करायचे आहे. ही स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धकाला महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेविषयी अधिक मिळवण्यासाठी https://sonyliv.onelink.me/Imq1/c30ug3g8 या लिकंवर क्लिक करा. तसेच सोनी लिव्ह या अॅपवर देखील अधिक माहिती देण्यात आली आहे. चाहत्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. आपल्या आवडत्या कार्यक्रमाचा भाग होण्याची.
संबंधित बातम्या