रोजच्या धकाधकीच्या जीवनात सोप्या आणि अगदी सहज बनवता येणाऱ्या खाद्य पदार्थांकडे महिलांचा कल असतो. कामातून वेळ काढून कुटुंबीयांसाठी चविष्ठ पदार्थ बनवण्याचा प्रयत्न महिला करत असतात. मग त्यामध्ये चपाती, पुरी किंवा पराठ्याला काही पर्यायी आणि सोपा असा उपाय आहे का? याचा ही महिला विचार करत असतात. सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला पुरी बनवण्याची अगदी सोपी ट्रीक सांगताना दिसत आहे. खरं तर या महिलेने देशी जुगाड केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओमधील महिलेने पुरी बनवण्यासाठी लागणाऱ्या कणकेचे गोळे करुन घेतले आहेत. तिने समान आकाराचे बनवलेले हे गोळे एका प्लास्टिकवर थोड्या अंतरावर ठेवले आहेत. जेणेकरुन ते एकमेकांना चिकटणार नाहीत. त्यानंतर तिने ते गोळे प्लास्टिकने झाकले आहेत. त्यावर पोलपाट जोर देऊन उलटे दाबले. जेणेकरुन त्या कणकेच्या गोळ्याची चपटी पुरी होईल. नंतर तिने ती पुरी तेलात टाकून तळून घेतली.
वाचा: भर कार्यक्रमात अक्षय कुमारने दिला अभिनेत्रीच्या ड्रेसवर पाय अन्...; पाहा नेमकं काय झालं
आता अशा प्रकारे बनवलेली पुरी फुगेल का? असा प्रश्न महिलांच्या डोक्यात येत असले. पण व्हिडीओमधील महिलेनी बनवलेली प्रत्येक पुरी ही टम्म फुगलेली दिसत आहे. त्यामुळे पुरी लाटून मग ती तळण्यात वेळ घालवण्यापेक्षा वर दिलेल्या पद्धतीने तुम्ही पुरी बनवू शकता. खरं तर या महिलेचा देशी जुगाड हा उपयोगी ठरु शकतो. या व्हिडीओला काही दिवसातच जवळपास ५ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
वाचा: १२-१३ तास सलग रडतेय; आशुतोषसाठी अरुंधतीची भावनिक पोस्ट
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा रुची केवत या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या महिलेचे नाव रुची असल्याचे म्हटले जात आहे. व्हिडीओ शेअर करताना तिने “ लाटणं न वापराता बनवा पूरी” असे कॅप्शन दिले आहे. अनेक यूजर्सने या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने 'किती सोपी आयड्या आहे पुरी बनवण्याची. मी एकदा करुन बघते' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने “अप्रतिम कल्पना आहे " अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने जेव्हा बरेच पाहुणे घरी येतात तेव्हा ही युक्ती खूप उपयोगी पडेल” असे म्हटले आहे.