मराठी चित्रपटातील इतिहासातील सर्वाधिक हिट ठरलेला आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणजे 'सैराट.' या चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता आकाश ठोसर यांनी बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. या पहिल्यावहिल्याच चित्रपटाने त्यांना रातोरात स्टार केले. पण आकाशला या चित्रपटातील भूमिका कशी मिळाली असा प्रश्न सर्वांना पडला आहे. स्वत: आकाशने एका मुलाखतीमध्ये याविषयी सांगितले आहे.
'सैराट' चित्रपटातील पश्या या भूमिकेपूर्वी आकाश अगदी सर्वसामान्य आयुष्य जगत होता. जेव्हा त्याची या भूमिकेसाठी निवड झाली तेव्हा तो बस स्टॉपवर उभा होता. नागराज मंजुळे यांच्या भावाची नजर परश्यावर पडली होती. त्यांनी परश्याला ऑडिशन देण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर त्याला ही भूमिका मिळाली. पण सुरुवातीला आकाशला माहिती नव्हते की तो ही मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याला २ ते ३ मिनिटांचा रोल असेल असे वाटले होते. जेव्हा त्याला मुख्य भूमिकेविषयी कळाले तेव्हा धक्काच बसला होता.
वाचा: अरुंधतीची प्रकृती गंभीर, कुटुंबीयांनी चाहत्यांकडे केली मदतीची मागणी
आकाशने त्याला मिळालेल्या परश्या या भूमिकेविषयी बोलताना म्हटले की, 'मी गावच्या बस स्टॉपवर बस पकडण्यासाठी उभा होतो. तेथे नागराज मंजुळे सरांचा भाऊ देखील उभा होता. त्यांची नजर माझ्यावर गेली. त्यांनी मला ऑडिशनसाठी बोलावसे होते. मी जाऊन ऑडिशन दिले. मला आधी वाटले की असेल ५ ते १० मिनिटांचा रोल. कोणाला माहिती मी सैराटमधील मुख्य भूमिकेसाठी कास्ट केले आहे. मला ते सत्य स्विकारायला वेळ लागला.'
वाचा: शाहिद कपूरने भर कार्यक्रमात विजय देवरकोंडाला केले किस
'सैराट' चित्रपटाचे बजेट ४ कोटी रुपये होते. पण चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा तो तुफान हिट ठरला. चित्रपटाने जवळपास १०० कोटी पेक्षा जास्त कमाई केली. तसेच रिंकू आणि आकाशला रातोरात स्टार बनवले. आकाश तर एका सामान्य कॉलेजमध्ये जाणार, पैलवानीच प्रशिक्षण घेणारा सोलापूरमधला मुलगा रातोरात स्टार बनला. या चित्रपटानंतर आकाशने काही हिंदी वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम केले.