रवीना टंडनचे पती अनिल थडानी यांनी 'पुष्पा'ला देशभरात कसे हिट बनवले? वाचा काय आहे कनेक्शन
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  रवीना टंडनचे पती अनिल थडानी यांनी 'पुष्पा'ला देशभरात कसे हिट बनवले? वाचा काय आहे कनेक्शन

रवीना टंडनचे पती अनिल थडानी यांनी 'पुष्पा'ला देशभरात कसे हिट बनवले? वाचा काय आहे कनेक्शन

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 18, 2024 03:30 PM IST

एए फिल्म्सचे सूत्रधार अनिल थडानी यांचा देशभरातील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यशात मोलाचा वाटा आहे. पुष्पा २ सिनेमासाठी त्यांची नेमकी काय भूमिका आहे चला जाणून घेऊया...

Film distributor Anil Thadani, husband of Raveena Tandon
Film distributor Anil Thadani, husband of Raveena Tandon

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनच्या आगामी 'पुष्पा २ : द रूल' या चित्रपटाचा ट्रेलर रविवारी संध्याकाळी मोठ्या थाटामाटात लाँच करण्यात आला. या भव्य सोहळ्याला अल्लू अर्जुन आणि त्याची सहकलाकार रश्मिका मंदाना उपस्थित होती. चित्रपटाचे निर्मातेही एका टप्प्यावर मंचावर उतरले. दरम्यान, एका व्यक्तीची जोरदार चर्चा रंगली. ती व्यक्ती म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनचे पती अनिल थडानी. आता अनिल यांनी चित्रपटाची निर्मीती किंवा दिग्दर्शन केलेले नाही. मग त्यांना का बोलावण्यात आले? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला जाणून घेऊया अनिल थडानी यांचे पुष्पा २ सिनेमाशी काय आहे कनेक्शन?

अनिल थडानींचे पुष्पा २ कनेक्शन

अनिल थडानी यांना पुष्पा २ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये खास स्टेजवर बोलावण्यात आले. 'पुष्पा २' हा जगभरात प्रदर्शित होणार आहे आणि अल्लू अर्जुनच्या स्टारडममुळे तो ब्लॉकबस्टर होईल, असे भाकीत थडानी यांनी केले. थडानीयांच्या एए फिल्म्सने २०२१ मध्ये पहिल्या भागाप्रमाणेच पुष्पा २ चे वितरण आणि सादरीकरण हिंदी बाजारात केले आहे. पुष्पा : द राइज हा चित्रपट हिंदी भाषेत गाजला होता. या चित्रपटाने तेलुगूमध्ये १३६ कोटी रुपये आणि डब केलेल्या हिंदीमध्ये १०६ कोटी रुपयांची कमाई केली. उत्तर भारतात - विशेषत: दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जास्त व्यवसाय केल्याने तेथे सिनेमा हिट ठरला. थडाणी यांच्या कंपनीनेच या चित्रपटाचे मार्केटमध्ये वितरण आणि सादरीकरण केले.

अनिल थडानी यांच्या कामाविषयी

अनिल थडानी तीन दशकांहून अधिक काळ चित्रपट वितरणाशी संबंधित काम करत आहेत. त्यांनी १९९४ मध्ये ये दिल्लगी चित्रपटापासून आपला प्रवास सुरू केला. २०१५ मध्ये त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांच्या डब आवृत्त्या हिंदीत सादर करण्यास सुरुवात केली. ज्याची सुरुवात एसएस राजामौली यांच्या बाहुबली : द बिगिनिंगपासून झाली. तेव्हापासून, अनिल यांनी केजीएफ 1, केजीएफ 2, कल्की 2898 इ.स. या आणि इतर काही सुपरहिट चित्रपटांचे हिंदीमध्ये वितरण केले. या सर्व चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन सर्वाधिक झाले. या दरम्यान थडानीयांनी सादर केलेले काही चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. विशेषत: आदिपुरुष आणि देवरा. मात्र, असे असूनही दाक्षिणात्य भागातील अनेक जण हिंदी पट्ट्यातील चित्रपटांसाठी त्यांना आणि एए फिल्म्सला पहिली पसंती मानतात.
वाचा: नागा चैतन्य शोभिता धुलिपालाच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, पाहुण्यांना काय भेट दिली पाहा

अनिल थडानी आणि रवीना टंडन

अनिल थडानी आणि रवीना टंडन यांनी २००३ मध्ये स्टंप्ड चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान डेटिंगला सुरुवात केली होती. नोव्हेंबर २००३ मध्ये त्यांनी साखरपुड्याची घोषणा केली आणि २२ फेब्रुवारी २००४ रोजी उदयपूरमध्ये लग्न केले. त्यांना मुलगी राशा आणि मुलगा रणबीरवर्धन अशी दोन मुले आहेत. १९ वर्षीय राशा थडानी लवकरच अभिषेक कपूरच्या आझाद चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

Whats_app_banner