मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कर्जतमध्ये बालपण, उल्हासनगरमध्ये कॉलेज; कसा मिळाला जुई गडकरीला पहिला ब्रेक?

कर्जतमध्ये बालपण, उल्हासनगरमध्ये कॉलेज; कसा मिळाला जुई गडकरीला पहिला ब्रेक?

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 27, 2024 01:39 PM IST

सध्या ठरलं तर मग या मालिकेत काम करणारी अभिनेत्री जुई गडकरी चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये जुईने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

कर्जतमध्ये बालपण, उल्हासनगरमध्ये कॉलेज; कसा मिळाला जुई गडकरीला पहिला ब्रेक?
कर्जतमध्ये बालपण, उल्हासनगरमध्ये कॉलेज; कसा मिळाला जुई गडकरीला पहिला ब्रेक?

सध्या छोट्या पडद्यावरील 'ठरलं तर मग' ही मालिका चर्चेत असून या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री जुई गडकरीने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. जुईची मालिकेतील ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. तसेच जुईच्या 'ठरलं तर मग' मालिकेने टीआरपी यादीमध्ये देखील अव्वळ स्थान पटकावले आहे. पण जुईचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये जुईने याविषयी वक्तव्य केले.

जुईचे बालपण हे कर्जत सारख्या छोट्या शहरात गेले आहे. कर्जतमध्ये चांगल्या शाळा नसल्यामुळे ती आत्याकडे नेरुळला राहायला गेली. तिने तेथे शालेय शिक्षण घेतल्यानंतर उल्हासनगरमधील सीएचएम या कॉलेजमधून पदवीधर शिक्षण घेतले. जुईचे वडील हे संगीतकार असल्यामुळे लहानपणापासूनच तिच्या कानावर संगीत पडले. दररोज तिचे वडील घरात वेगवेगळ्या कार्यक्रमांची तालिम करायचे. त्यामुळे जुईला संगीताची गोडी लागली होती.
वाचा: कौतुकास्पद! रितेश देशमुखची मुले फुटबॉल खेळण्यासाठी परदेशात

जुईने शिक्षणाविषयी बोलताना मुलाखतीमध्ये म्हटले की, "उल्हासनगरमधील सीएचएम कॉलेजमध्ये मी बीएमएम इन अॅडवर्टाइजमेंटमध्ये केले. त्यानंतर त्यामध्येच मी पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे वेलिंगकर इंस्टीट्यूट मधून एमबीए इन मार्केटिंगमध्ये केले. उपान्त्य विशारदपर्यंत गाण्याचेही शिक्षण झाले आहे. हार्मोनियमच्याही पाच परिक्षा दिल्या आहेत. कथ्थकच्याही तीन परिक्षा झाल्या आहेत."

या मुलाखतीमध्ये जुई गडकरीने तिला पहिल्या मालिकेची ऑफर कशी मिळाली याविषयी देखील सांगितले आहे. "माझ्या एका मैत्रीणीसोबत मी चौक येथील एनडी स्टुडिओला गेले होते. त्यावेळी खरंतर माझ्या मैत्रिणीला ऑडिशन द्यायचे होते. तिथे जे लोक ऑडिशन घेत होते त्यांनी मलादेखील ऑडिशन द्यायला लावली आणि 'बाजीराव मस्तानी' या मालिकेसाठी माझे सिलेक्शन झाले. एका कामानंतर दुसरे काम, दुसऱ्यातून तिसरे असे मिळत गेले. दरम्यान मी मास्टर करत होते. कर्जतच्या कर्जतमध्ये स्टुडिओ आहे, मजा येईल असा विचार करत त्यावेळी खरंतर मी काम करत होते" असे जुई म्हणाली.
वाचा: ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमासाठी प्रविण तरडेची खास पोस्ट

"माझा प्रवास कायम चढता राहिला आहे, असे मी म्हणार नाही. तब्येतीमुळे मध्ये जवळपास तीन वर्षे मला ब्रेक घ्यावा लागला होता. ती तीन वर्षे माझ्यासाठी फार कठीण होती. त्या तीन वर्षात मला खूप ऑफर्स येत होत्या. मला त्या स्विकारता येत नव्हत्या. पण तरीही माझा प्रवास, करिअर चढते राहिले असे चाहत्यांना वाटते याचे श्रेयदेखील त्यांनाच जाते. कारण प्रत्येक कलाकर, प्रत्येक व्यक्ती मेहनत करत असतो. प्रामाणिकपणे काम करण्याकडे माझा कल असतो. पण प्रेक्षकांनी आपल्याला स्वीकारणे आणि पसंती देणे हे खूप महत्त्वाचे आहे. तीन वर्षांच्या गॅपमध्ये मी पूर्णपणे स्वत:ला वेळ दिला" असे जुई म्हणाली.

WhatsApp channel