Alka Kubal : सडपातळ असलेल्या अलका कुबल यांचं वजन अचानक ११० किलो कसं झालं? वाचा किस्सा...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Alka Kubal : सडपातळ असलेल्या अलका कुबल यांचं वजन अचानक ११० किलो कसं झालं? वाचा किस्सा...

Alka Kubal : सडपातळ असलेल्या अलका कुबल यांचं वजन अचानक ११० किलो कसं झालं? वाचा किस्सा...

Jan 28, 2025 05:11 PM IST

Alka Kubal Weight Gain Story : एकीकडे अलका कुबल आपल्या कारकिर्दीत यश मिळवत होत्या. तर, दुसरीकडे त्यांना एक अत्यंत कठीण काळही सोसावा लागला होता.

सडपातळ असलेल्या अलका कुबल यांचं वजन अचानक ११० किलो कसं झालं? वाचा किस्सा...
सडपातळ असलेल्या अलका कुबल यांचं वजन अचानक ११० किलो कसं झालं? वाचा किस्सा...

Alka Kubal Tragic Memories : आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजेच अलका कुबल. आपल्या अभिनयाने आणि निर्मितीने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या अलका कुबल यांनी मराठी सिनेमाला दिलेलं योगदान अद्वितीय आहे. चित्रपट क्षेत्रातील त्यांचे कार्य फक्त अभिनयापुरते मर्यादित नसून, त्यांनी निर्मात्या म्हणूनही खूप मोठे योगदान दिले आहे. लॉकडाऊनच्या काळात कोल्हापूरमध्ये दोन मल्टिप्लेक्स बांधण्याचा निर्णय घेणाऱ्या अलका कुबल यांचा हा उपक्रम मराठी सिनेमा क्षेत्राला मोठा योगदान देणारा ठरला आहे. यावर्षी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या मल्टिप्लेक्सचे उद्घाटन होणार आहे.

एकीकडे अलका कुबल आपल्या कारकिर्दीत यश मिळवत होत्या. तर, दुसरीकडे त्यांना एक अत्यंत कठीण काळही सोसावा लागला होता. गेली ४० वर्षे इंडस्ट्रीत काम करत असलेल्या अलका कुबल यांनी अनेक कठीण प्रसंग अनुभवले, पण २००७ मध्ये झालेल्या अपघाताने त्यांना एका वेगळ्याच संकटात टाकले होते. पण, त्यावेळी झालेल्या एक गंभीर अपघातात त्यांच्या मणक्याचा भाग पूर्णपणे मोडला होता. या अपघातानंतर त्यांना मोठी सर्जरी करावी लागली होती. 

मणका रिप्लेस केला! 

डॉक्टरांनी त्यांचा मणका काढून त्याला रिप्लेस केला होता. इतकंच नाही तर, त्यांच्या माणक्यात प्लेट लावून उपचार करण्यात आले. या उपचारांमुळे त्यांच्या शरीरावर प्रचंड परिणाम झाला. या अपघातानंतर त्यांना बेडरेस्ट घ्यावा लागला होता. त्यावेळी त्यांचे वजन अचानक ११० किलोपर्यंत वाढले होते, आणि त्या वेळेस त्यांना अंथरुणावरून उठणेही कठीण होऊन गेले होते.

अरुंधती परत येतेय! लोकप्रिय मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये दिसली मधुराणी प्रभुलकरची झलक

डॉक्टरांनी दिला आधार

पण, या कठीण काळातही अलका कुबल यांनी हार मानली नाही. अपघाताच्या त्या काळात त्यांचं मनोबल उंचावण्याचा एक मोठा प्रयत्न त्यांच्या डॉक्टरांनी केला. त्यावेळी सर्जरी झाल्यानंतर त्यांच्या संपूर्ण शरीरातील हालचाल कमी झाली होती. इतकंच नाही तर,एका जागेवरून उठून बसणे देखील त्यांच्यासाठी जवळपास अशक्य होऊन गेले होते. पण, त्या काळात डॉक्टरांनी त्यांना आधार देत त्यांना उभं राहण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्यांचं म्हणणं होतं, 'तू एक चांगली कलाकार आहेस, उभी राहायचं आहेस! हे धरून बसू नकोस. मी तुला उभं करणार!', डॉक्टरांचे हे शब्द अलका कुबल यांना त्या कठीण वेळी देवाचं रूप वाटले. या सगळ्यावर मात करत अलका कुबल यांनी आपल्या जीवनातील या वेदनादायक काळावर विजय मिळवला. या घटनेनंतर त्यांचं वजन कमी होण्यास सुरुवात झाली आणि त्यांनी स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध केलं. त्यांची ही कथा केवळ एक प्रेरणा नाही, तर संघर्षाचे मोठे उदाहरण आहे.

Whats_app_banner