Salim Khan Talks About Two Wives : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान केवळ व्यावसायिकच नाही तर वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणाने बोलतात. सलीम यांनी दुसरं लग्न केलं तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की, त्याचं कुटुंब तुटेल, पण तसं झालं नाही. त्यांचे कुटुंब आनंदाने एकत्र राहत आहे. आता सलीमने सलमा आणि हेलन या त्यांच्या दोन बायकांबद्दल सांगितले आहे. त्यांच्या दोन बायकांचं नातं कसं आहे, हे त्यांनी सांगितलं. त्यांनी आपल्या दोन्ही पत्नींचे कौतुकही केले आहे.
डीएनएला दिलेल्या मुलाखतीत सलीम खान म्हणाले की, ‘मी नशीबवान आहे की मला दोन बायका आहेत आणि दोघेही शांततेत राहतात. माझ्या दोन्ही बायका खूप सुंदर आहेत आणि त्या सुंदरपणे आमचं कुटुंब हाताळत आहेत.’
झूमला दिलेल्या मुलाखतीत सलीमने सांगितले होते की, हेलनसोबतच्या नात्याबद्दल त्यांनी त्यांची पहिली पत्नी सलमाला सांगितले होते. सलीम यांनी म्हटले होते की, सलमाला हेलनसोबतच्या नात्याबद्दल कोणत्याही माध्यमाद्वारे कळू द्यायचे नव्हते, म्हणून त्याने स्वतःला सांगण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी सलमाला सांगितलं, तेव्हा तिने काही मला हात मिळवून तुम्ही खूप चांगलं केलं, असं म्हटलं नाही. साहजिकच अडचणी होत्या, पण त्या फार काळ टिकल्या नाहीत. त्यानंतर सर्व काही मान्य करण्यात आले.'
आपल्या मुलांबाबत बोलताना सलीम म्हणाले की, ‘मी मुलांना म्हटलं होतं की, माझ्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आहे आणि माझं तिच्याशी लग्न झालं आहे. तुम्ही तिच्यावर तुमच्या आईसारखं प्रेम कराल, अशी माझी अपेक्षा नाही, पण तुम्ही तिचा तसा आदर करावा, अशी माझी इच्छा आहे.’ अरबाज खान एकदा म्हणाला होता की, ‘माझ्या आईने मला माझ्या वडिलांविरोधात कधीही चिथावणी दिली नाही. त्यांच्या स्वतःच्या अडचणी होत्या, पण तुझे वडील असे किंवा तसे आहेत हे तिने आम्हाला कधीच सांगितले नाही.’
सलीम खान यांनी १९६०मध्ये सलमा खान यांच्याशी लग्न केले आणि त्यांना सलमान, अरबाज, सोहेल आणि अलविरा अशी ४ मुले आहेत. त्यानंतर सलीम यांनी १९८० मध्ये अभिनेत्री हेलन यांच्याशी लग्न केले आणि अर्पिता खानला दत्तक घेतले. हे संपूर्ण खान कुटुंब सध्या एकाच छताखाली आनंदाने नांदत आहे. अनेक मंगल प्रसंगी हे संपूर्ण कुटुंब एकत्र जल्लोष करताना दिसतं.
संबंधित बातम्या