मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Munjya : 'मुंज्या' चित्रपटाची जोरदार चर्चा ! दुसऱ्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Munjya : 'मुंज्या' चित्रपटाची जोरदार चर्चा ! दुसऱ्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 09, 2024 10:53 AM IST

Munjya movie Box Office Collection: अभिनेत्री शरवरी वाघ आणि सत्यराज यांचा 'मुंज्या' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.

Munjya: 'मुंज्या' चित्रपटाची कमाई
Munjya: 'मुंज्या' चित्रपटाची कमाई

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु होती. आता अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. स्त्री या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणलेला हा हॉरर कॉमेडी चित्रपट सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास यशस्वी ठरत आहे. दोन दिवसात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'मुंज्या' चित्रपटाची कमाई

'मुंज्या' चित्रपटासोबत कोणताही दुसरा मोठा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे प्रेक्षकांकडे विकेंडसाठी एकच पर्याय उपलब्ध आहे. तसेच चित्रपटाचे कथानक चांगले असल्याचे म्हटले जात आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने ४ कोटी २१ लाख रुपये कमावले आहेत. क्रिटिक्सने पहिल्या दिवशी हा चित्रपट फार फार १.५ कोटी ते २ कोटी कमावेल असे म्हटले होते. पण चित्रपटाने सर्वांचे तर्कवितर्क मोडून चांगली कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ६ कोटी ७५ लाख रुपये कमावले आहेत. आतापर्यंत चित्रपटाने दोन दिवसात १० कोटी ९६ लाख रुपयांची कमाई केली आहे.
वाचा: संघर्ष बिगर काही खरं नसतं!; "आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा" सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

चित्रपटाच्या बजेट विषयी

'मुंज्या' या चित्रपटाचे बजेट हे ३० कोटी आहे. दोन दिवसातच चित्रपटाने १० कोटी कमावल्यामुळे चित्रपटाला नफा होणार असल्याचे समोर आले आहे. येत्या काळात चित्रपट आणखी कमाई करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. चित्रपट ५० कोटी कमावणार असल्याचे म्हटले जात आहे. निर्माते आणि कलाकारांनी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रचंड मेहनत घेतली.
वाचा: गरोदरपणात अभिनेत्रीला लागले होते बिअर पिण्याचे डोहाळे! जाणून घ्या ही अभिनेत्री आहे तरी कोण?

'मुंज्या' चित्रपटाविषयी

'मुंज्या' या चित्रपटात VFXचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. आयएमडीबीने या चित्रपटाला १० पैकी ७.२ रेटिंग दिली आहे. तसेच या चित्रपटात शरवरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंह आणि सत्यराज हे कलाकार दिसत आहेत. तसेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असल्याचे दिसत आहे. येत्या काळात चित्रपटाची कमाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपट ५० कोटी रुपयांचा पल्ला पार करणार का? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: राजेश खन्नासोबत सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून डिंपल कपाडीया 'या' अभिनेत्याला करत होत्या डेट

टी-२० वर्ल्डकप २०२४