मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Munjya Box Office Collection: 'मुंज्या' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! चार दिवसात कमावले कोट्यवधी रुपये

Munjya Box Office Collection: 'मुंज्या' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! चार दिवसात कमावले कोट्यवधी रुपये

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 11, 2024 07:39 AM IST

Munjya Box Office Collection Day 4 : 'मुंज्या' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी पासूनच चर्चेत होता. आता या चित्रपटाने चार दिवसात किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Munjya: 'मुंज्या' चित्रपटाची कमाई
Munjya: 'मुंज्या' चित्रपटाची कमाई

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'मुंज्या' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी पासूनच चर्चेत आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हॉरर कॉमेडी असलेला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाने चार दिवसात किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. तसेच विकेंडला चित्रपटाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'मुंज्या' चित्रपटाच्या कमाईविषयी

पहिल्या दिवशी चित्रपटाने केवळ ४ कोटी रुपयांची बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ७.२५ कोटी रुपये कमावण्यात चित्रपट यशस्वी ठरला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच विकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. रविवारी चित्रपटाने ८ कोटी रुपयांचा गल्ला जमावला. चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घट झाली आणि केवळ ३.७५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे एकूणच चित्रपटाने २३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ३० कोटी बजेट असलेला चित्रपट लवकरच नफा कमवेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
वाचा: किडनॅप झालेले अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडे सापडले! कुठे आणि कसे जाणून घ्या सविस्तर

चित्रपटाच्या बजेट विषयी

'मुंज्या' या चित्रपटाचे बजेट हे ३० कोटी आहे. दोन दिवसातच चित्रपटाने १० कोटी कमावल्यामुळे चित्रपटाला नफा होणार असल्याचे समोर आले आहे. येत्या काळात चित्रपट आणखी कमाई करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. चित्रपट ५० कोटी कमावणार असल्याचे म्हटले जात आहे. निर्माते आणि कलाकारांनी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रचंड मेहनत घेतली.
वाचा: बॉलिवूड अभिनेत्रीने संपवले स्वत:चे आयुष्य, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

'मुंज्या' चित्रपटाविषयी

'मुंज्या' या चित्रपटात VFXचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. आयएमडीबीने या चित्रपटाला १० पैकी ७.२ रेटिंग दिली आहे. तसेच या चित्रपटात शरवरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंह आणि सत्यराज हे कलाकार दिसत आहेत. तसेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असल्याचे दिसत आहे. येत्या काळात चित्रपटाची कमाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आताच चित्रपटाने २० कोटी रुपयांचा पल्ला पार केला आहे. चित्रपट ५० कोटी रुपयांचा पल्ला पार करणार का? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: सावनीशी लग्न न करण्यासाठी हर्षवर्धनने आखला नवा प्लान, काय असेल मिहिर आणि मुक्ताची प्रतिक्रिया?

टी-२० वर्ल्डकप २०२४