झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'देवमाणूस.' या मालिकेची कथा आणि पात्रांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. त्यामधील डॉक्टर अजितची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड भलताच लोकप्रिय झाला. त्याला अनेकजण देवमाणूस म्हणून देखील आवाज देऊ लागले होते. ही मालिका संपल्यानंतर किरणला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याच्या या चित्रपटात अभिनेत्री भाग्यश्री मोटे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
दिवाळीच्या मंगलमय वातावरणात नव्या मराठी चित्रपटसृष्टीची घोषणा करण्यात आली आहे. किरण गायकवाड आणि भाग्यश्री मोटे यांच्या आगामी चित्रपटाचे नाव 'जंतर मंतर छूमंतर' असे आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात किरण आणि भाग्यश्री पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करण्यात आले आहे.
'जंतर मंतर छूमंतर' या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांचा सहभाग असून, अभिज्ञा भावे, प्रियदर्शन जाधव, किरण गायकवाड, निखिल चव्हाण, महेश जाधव आणि भाग्यश्री मोटे या कलाकारांच्या दमदार अभिनयाची झलक या चित्रपटात पाहायला मिळेल. हा एक हॅारर कॅामेडी असून यात मोठ्या प्रमाणात विएफएक्सची जादू अनुभवायला मिळणार आहे. पहिल्यांदाच मराठी चित्रपटांमध्ये अशा पद्धतीच्या AI आणि विएफएक्सचा वापर होत आहे.
वाचा: 'दृष्ट लागण्या जोगे सारे' गाण्यातील अभिनेत्रीला खरोखरच लागली दृष्ट? अगदी कमी वयात घेतला जगाचा निरोप
दिवाळीच्या खास शुभमुहूर्तावर सिनेमाच्या शीर्षकासह, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली. ‘जंतर मंतर छूमंतर’ हा चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले आहे. तसेच चित्रपटात असलेली स्टारकास्ट पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.