मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  पारू आणि आदित्य झाले 'होम मिनिस्टर'मध्ये सहभागी, अक्कलकोट विशेष भागात आदेश बांदेकरांसोबत मजा

पारू आणि आदित्य झाले 'होम मिनिस्टर'मध्ये सहभागी, अक्कलकोट विशेष भागात आदेश बांदेकरांसोबत मजा

May 25, 2024 03:33 PM IST
  • twitter
  • twitter
  • 'होम मिनिस्टर' शोच्या एका विशेष भागाचे चित्रीकरण हे अक्कलकोट येथे करण्यात आले आहे. या शोमध्ये ‘पारू’ मालिकेतील कलाकार सहभागी झाल्याचे पाहायला मिळते.
झी मराठी वाहिनीवरील पारु मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. या मालिकेतील पारु आणि आदित्यची जोडी तर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. आता या मालिकेतील कलाकार हे 'होम मिनिस्टर'मध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
share
(1 / 5)

झी मराठी एका नवीन रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. हे  नवीन रूप उलगडणार आहे २७ मे २०२४ च्या सायंकाळी. आपण कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने करतो म्हणूनच महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर पोहोचले अक्कलकोटला ‘श्री स्वामी समर्थ मंदीरात.’
share
(2 / 5)

अक्कलकोटला स्वामींच्या मंदीरात ३०,००० सोनचाफ्याच्या फुलांची आरास केली गेली होती. आदेश भाऊजी आणि पारू टीमने मिळून स्वामींची आरती करून स्वामींपुढे नवीन वाटचालीसाठी प्रार्थना केली आणि आशिर्वाद घेतले. यावेळी पारु आणि आदित्यची जोडी देखील उपस्थित होती. या मालिकेच्या टीमने त्यांना मदत केली आहे.
share
(3 / 5)

यानंतर याच स्वामींच्या पुण्यभूमीत पारू आणि आदित्यसोबत पार पडला 'होम मिनिस्टरचा' खेळ. या विशेष भागात अनेक किस्से आणि धम्माल मज्जा मस्ती झाली. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आता आगामी भागाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
share
(4 / 5)

'पारू' म्हणजेच 'शरयू सोनावणेने' आपला आनंद व्यक्त करताना सांगितले," मी झी मराठीचे खूप आभार मानते की त्यांच्यामुळे मला अक्कलकोटला जायची संधी मिळाली आणि स्वामींच्या पादुकांना स्पर्श करायला मिळाले. चाफ्याच्या फुलांची भव्य आणि आकर्षक सजावट पाहून डोळे दिपून गेले होते.  ह्यासोबतच  'होम मिनिस्टर' मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. मी  स्वतःला खूप भाग्यवान समजते मला स्वामींचे इतके सुंदर दर्शन या निमित्ताने करता आले, ते ही इतक्या महत्वाच्या दिवशी."
share
(5 / 5)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज