Shah Rukh Khan News: आता एकत्र चित्रपट येणार वाटतं!; ईडी शीरनला शाहरुख खानने शिकवली आयकॉनिक पोज!-hollywood singer ed sheeran meet shah rukh khan and did srk s iconic romantic pose see video ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shah Rukh Khan News: आता एकत्र चित्रपट येणार वाटतं!; ईडी शीरनला शाहरुख खानने शिकवली आयकॉनिक पोज!

Shah Rukh Khan News: आता एकत्र चित्रपट येणार वाटतं!; ईडी शीरनला शाहरुख खानने शिकवली आयकॉनिक पोज!

Mar 14, 2024 01:20 PM IST

Shah Rukh Khan-Ed Sheeran Video: गायक ईडी शीरन सध्या त्याच्या म्युझिक कॉन्सर्टसाठी मुंबईत आला आहे. यावेळी शाहरुख खान आणि ईडी शीरेन यांची भेट झाली.

Shah Rukh Khan-Ed Sheeran Video
Shah Rukh Khan-Ed Sheeran Video

Shah Rukh Khan-Ed Sheeran Video: बॉलिवूडचा रोमान्स किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि हॉलिवूडचा रोमँटिक गायक ईडी शीरन (ED Sheeran) यांना एकत्र पाहून आता चाहत्यांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत. गायक ईडी शीरन सध्या त्याच्या म्युझिक कॉन्सर्टसाठी मुंबईत आला आहे. यावेळी शाहरुख खान आणि ईडी शीरेन यांची भेट झाली. या वेळी शाहरुख खान याने ईडी शीरेन यांना आपली आयकॉनिक पोज देखील शिकवली. शाहरुख खान त्याच्या चित्रपटांमधील रोमँटिक भूमिकांसाठी ओळखला जातो, तर गायक आणि गीतकार ईडी शीरन देखील आपल्या रोमँटिक गाण्यांनी जगभरातील चाहत्यांचा लाडका बनला आहे. आता रोमान्सच्या दुनियेतील दोन बादशाहांना एकत्र पाहून सगळेच आनंदले आहेत.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान आणि ईडी शीरन एकत्र दिसले आहेत. या व्हिडीओमध्ये, ईडी शीरनने शाहरुख खानसोबत त्याची आयकॉनिक रोमँटिक पोझ केली आहे. दोघांना एकत्र पाहून चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शाहरुख खानच्या चित्रपटात ईडी शीरनने गाणे गायले, तर धमाल होईल, असे सोशल मीडिया युजर्सचे म्हणणे आहे.

Viral Video: मुंबई ते गोवा प्रवासादरम्यान सिद्धार्थ जाधव विमान कंपनीवर भडकला! नेमकं काय झालं?

ईडी शीरनने घेतली शाहरुख खानची भेट!

प्रसिद्ध गायक आणि गीतकार ईडी शीरन सध्या मुंबईत आहे. मुंबईत त्याची एक लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. या दरम्यान, गायकाने नुकतीच शाहरुख खान आणि फराह खान यांची भेट घेतली. तिघांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यानंतर ईडी शीरनने आयुष्मान खुराना आणि अरमान मलिक यांची देखील भेट घेतली आहे. शाहरुख खान आणि ईडी शीरन यांना एकत्र पाहिल्यानंतर आता सोशल मीडिया यूजर्सही या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करत एका युजरने लिहिले की , 'काय धमाकेदार क्रॉसओव्हर होईल.' आणखी एका युजरने लिहिले की, ‘आम्हाला माहित आहे... आता हे दोघे एकत्र प्रोजेक्ट करणार आहेत.’

मुंबईत होणार ईडी शीरनचा म्युझिक शो!

हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक ईडी शीरनने मनोरंजन विश्वाला अनेक सुपर हिट गाणी दिली आहेत. 'परफेक्ट', 'शेप ऑफ यू','मेरी ख्रिसमस','थिंकिंग आऊट लाऊड', 'फोटोग्राफ' ​​ही त्याची गाणी विशेष गाजली आहेत. येत्या १६ मार्चला मुंबईत त्याची लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे, ज्यामध्ये तो परफॉर्म करताना दिसणार आहे.