मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Holi 2023: रंग बरसे ते बलम पिचकारी.... बॉलिवूडच्या ‘या’ गाण्यांशिवाय होळी वाटेल अधुरी!

Holi 2023: रंग बरसे ते बलम पिचकारी.... बॉलिवूडच्या ‘या’ गाण्यांशिवाय होळी वाटेल अधुरी!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 06, 2023 10:00 AM IST

Holi Play list 2023: होळी आणि धुळवड जरी रंगांचा सण असला, तरी गाण्यांशिवाय मात्र अपुराचा आहे.

Holi 2023 playlist
Holi 2023 playlist

Holi Play list 2023: होळी म्हणजे रंगांचा सण... रंगांची उधळण! या सणाच्या दिवशी सगळेच आनंदाने एकमेकांना रंग लावतात. देशभरात हा सण अतिशय जल्लोषात साजरा केला जातो. होळी आणि धुळवड जरी रंगांचा सण असला, तरी गाण्यांशिवाय मात्र अपुराचा आहे. होळी म्हटली की, वेगवेगळे रंग, खाद्यपदार्थ यांसोबतच धमाल गाणी देखील सुरू होतात. तुम्ही देखील होळीसाठी अशीच धमाल गाण्यांची प्लेलिस्ट बनवायचा विचार करत असाल, तर ही गाणी खास तुमच्यासाठीच...

ट्रेंडिंग न्यूज

बलम पिचकारी

‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण या जोडीवर चित्रित झालेलं ‘बलम पिचकारी’ हे गाणं सुपरहिट ठरलं आहे. चित्रपटाइतकंच या गाण्यालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. होळीच्या प्लेलिस्टमध्ये हे गाणं असायलाच हवं.

डू मी अ फेवर लेट्स प्ले होली

प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार यांच्या २००५मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वक्त’ या चित्रपटातील ‘डू मी अ फेवर लेट्स प्ले होली’ हे गाणे चांगलेच गाजले होते. आजही होळीच्या दिवशी हे गाणे आवर्जून वाजवले जातेच. सुनिधी चौहान आणि अनु मलिक यांनी या गाण्याला आपला आवाज दिला होता.

होली खेले रघुवीरा

‘बागबान’ चित्रपटातील होली ‘खेले रघुवीरा अवध में’ हे गाणे होळीसाठी सगळ्यांचेच आवडते गाणे आहे. हे गाणे अमिताभ बच्चन, अलका याज्ञिक, सुखविंदर सिंग आणि उदित नारायण यांनी गायले आहे. तर, अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्यावर हे गाणे चित्रित झाले आहे.

रंग बरसे

‘सिलसिला’ चित्रपटातील ‘रंग बरसे’ या आयकॉनिक गाण्याशिवाय होळीचा सण अधुराच आहे. १९८१ साली आलेल्या ‘सिलसिला’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा आणि संजीव कुमार यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. गाण्यात या चौघांची अधुरी प्रेमकहाणी अतिशय सुंदर पद्धतीने सांगण्यात आली आहे. ‘रंग बरसे’ या गाण्याचे बोल हरिवंशराय बच्चन यांनी लिहिले आहेत.

होली के दिन दिल खिल जाते है

बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'शोले.' या चित्रपटात जय-वीरु या जोडीवर चित्रित झालेलं होळीचं गाणं देखील खूप गाजलं. ‘होली के दिन दिल खिल जाते है रंगो में रंग मिल जाते है...’ असे बोल असलेल्या या गाण्यात धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे.

IPL_Entry_Point

विभाग