Sharad Pawar : नाटकांतून इतिहासाचा विपर्यास होऊ नये; 'या' नाटकाचा उल्लेख करत शरद पवारांचं आवाहन-historical drama must have concrete proof stop magnifying wrong people appeals sharad pawar in marathi natya sammela ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sharad Pawar : नाटकांतून इतिहासाचा विपर्यास होऊ नये; 'या' नाटकाचा उल्लेख करत शरद पवारांचं आवाहन

Sharad Pawar : नाटकांतून इतिहासाचा विपर्यास होऊ नये; 'या' नाटकाचा उल्लेख करत शरद पवारांचं आवाहन

Jan 06, 2024 06:37 PM IST

Sharad Pawar in Marathi Natya Sammelan : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज नाट्यनिर्मात्यांना महत्त्वाचं आवाहन केलं.

Sharad Pawar in Marathi Natya Sammelan
Sharad Pawar in Marathi Natya Sammelan

Sharad Pawar in Marathi Natya Sammelan : ‘पुराव्यांच्या आधारावर असल्यास ऐतिहासिक नाटकं जरूर सादर व्हावीत. रसिक अशा नाटकांची आतुरतेनं वाट पाहत असतात. मात्र, सोयीचा इतिहास मांडणं, इतिहासाचा विपर्यास करणं, इतिहासातील काही खलवृत्तींचं अनावश्यक उदात्तीकरण करणं हं थांबवावं,’ असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.

पुण्यातील पिंपरी चिंचवड इथं आयोजित १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं आज उद्घाटन झालं. त्यावेळी शरद पवार बोलत होते. त्यांनी नाट्यचळवळींचा व नाट्य संमेलनांचा मागोवा घेतला. मराठी रंगभूमीच्या प्रयोगशीलतेचं व सर्जनशीलतेचं त्यांनी आवर्जून कौतुक केलं.

Prashant Damle : मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय! अभिनेते प्रशांत दामले असं का म्हणाले? वाचा...

नाटकांच्या विषयाबद्दल बोलताना शरद पवार यांनी ऐतिहासिक नाटकांबद्दल विस्तारानं भूमिका मांडली. बिडंबनात्मक नाटकं लोकांना पसंत पडतात, पण ती राजकीय मंडळींच्या पचनी पडतील का हा प्रश्न आहे. मात्र, राजकीय नाटकांपेक्षा देखील ऐतिहासिक नाटकांचं सादरीकरण संवेदनशील झालं आहे, कारण प्रेक्षकवर्ग अधिक जाणकार, चिकित्सक आणि अभ्यासू झाला आहे, असं सांगून त्यांनी वसंत कानेटकरांच्या 'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकाचा दाखला दिला.

'रायगडाला जेव्हा जाग येते' हे नाटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कौटुंबिक बाबीवर अधिक प्रकाश टाकणारं होतं, परंतु आजच्या प्रेक्षकाला या नाटकात महाराज हतबल झालेले अधिक दाखवलं असं वाटतं. रायगडाला जाग येते ह्या शीर्षकात जाग म्हणजे उभारी येणं अभिप्रेत आहे परंतु नाटकात महाराजांच्या मनातील शल्य अधिक तीव्रतेनं दाखवलं आहे हे नाटक मी दिल्लीत पाहिलंय. सध्याचे प्रेक्षक कुटुंब कलहातील महाराज का दाखवलेत? असा प्रश्न करतील व त्याचे पुरावे मागतील, असं शरद पवार म्हणाले.

Raj Thackeray : आत्ताचं सरकार म्हणजे ‘सहारा चळवळ’, राज ठाकरेंची महायुती सरकारवर टीका

आजच्या प्रेक्षकांना कटू सत्याची ओढ

'ऐतिहासिक नाटकं इतिहासाच्या साधनांच्या, दस्त-पुराव्यांच्या आधारावर असली की जरूर सादर व्हावीत. रसिक अशा नाटकांची आतुरतेनं वाट पाहत असतात. सोयीचा इतिहास मांडणं, इतिहासाचा विपर्यास करणं, इतिहासातील काही खलवृत्तींचं अनावश्यक उदात्तीकरण करणं हे थांबलं पाहिजे. वास्तव इतिहासात नाट्यमय घटनांचा मसाला कमी असला तरी प्रेक्षक स्वीकारतील. ओटीटी, वेब सीरिजवर सत्यावर आधारीत मालिका, माहितीपटांना मिळणारा प्रतिसाद पाहता मला असं वाटतं की सध्याच्या प्रेक्षकांना कटू सत्याची ओढ अधिक आहे, असं निरीक्षणही शरद पवारांनी मांडलं.

Whats_app_banner