मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hina Khan: गाण्याचं शूटिंग करताना हिना खान पायरीवरून घसरली अन् धपकन पडली! व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

Hina Khan: गाण्याचं शूटिंग करताना हिना खान पायरीवरून घसरली अन् धपकन पडली! व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 26, 2024 10:48 AM IST

Hina Khan Viral Video: नुकतीच हिना खानने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती जिन्यावरून घसरून खाली पडताना दिसली आहे.

Hina Khan Viral Video
Hina Khan Viral Video

Hina Khan Viral Video: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री हिना खान चाहत्यांमध्ये अतिशय प्रसिद्ध झाली आहे. हिना खान सध्या वेगवेगळ्या गाण्यांच्या आणि जाहिरातींच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाली आहे. हिना खान सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. हिना खान अनेकदा तिच्या नव्या अपडेट्सची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच हिना खानने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती जिन्यावरून घसरून खाली पडताना दिसली आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ पाहून तिला बरीच दुखापत झाली असावी, असे वाटत आहे.

नुकतीच हिना खान ‘बिग बॉस १७’चा विजेता मुनव्वर फारुकीसोबत शूटिंगसाठी कोलकाता येथे गेली होती. येथे या दोघांनी एका व्हिडीओ गाण्याचे शूटिंग केले. मात्र, हे गाणे शूट करताना हिना गंभीर जखमी झाली आहे. अभिनेत्रीने या गाण्याच्या शूटिंगचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पायऱ्यांवरून घसरून पडताना दिसली आहे. हिनाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुसळधार पाऊस पडत आहे आणि ती शूटिंग करण्यास तयार आहे. याचवेळी शूटिंग दरम्यान हिना खान पटकन पायऱ्या उतरत असताना तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली.

Viral Video: लग्न लागताच पत्नीच्या पाया पडला प्रथमेश परब! व्हायरल व्हिडीओ पाहून चाहतेही करतायत कौतुक!

नेमकं काय झालं?

घसरल्यानंतर हिना पटकन उठली आणि तिने गाण्याचे उरलेले शूटिंग पूर्ण केले. स्वतः बद्दलची ही पोस्ट शेअर करताना हिना खान हिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी साडी नेसली होती आणि हिल्सही घातल्या होत्या. त्यावेळी तिथली जागा खूप निसरडी होती आणि पावसात शूटिंग करताना मला सतत खाली बघावे लागत होते. याच दरम्यान मी घसरले आणि वेळ न दवडता परत उठले. कारण शूटिंगमध्ये वेळ गेला तर,कुणाला तरी या वेळेची किंमत मोजावी लागते.’

अभिनेत्रीने पुढे लिहिले की, ‘आपण पडलो किंवा जखमी झालो, तरी आपल्याला उठून आपले काम करावे लागते. माझ्यासाठी एखाद्या कमिटमेंटचा अर्थ असा आहे. कलाकाराची जबाबदारी केवळ त्याच्या कमीटमेंट पूर्ण करणे नसते. तर, आपल्या संपूर्ण टीमला सोबत घेऊन काम व्यवस्थित पूर्ण करणे हे देखील कलाकाराचे काम आहे.’

नेटकरी काळजीत

आता अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल युजर्सही यावर भरभरून कमेंट करत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘तू खूप मेहनती आहेस’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘तू आता ठीक आहेस का?’ तिसऱ्याने लिहिले की, ‘स्वतःची काळजी घे, तू सुपर आहेस आणि मेहनती आहेस.’

IPL_Entry_Point

विभाग