टीव्ही अभिनेत्री हिना खान कॅन्सरशी झुंज देत आहे. हिना खान अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना तिच्या तब्येतीबद्दल अपडेट देत असते. काही दिवसांपूर्वी हिना खानने हॉस्पिटलमधील फोटो शेअर केले होते. आता हिना खानने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. हिना खान रुग्णालयातून परतली असून तिने तिच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. गेले १५-२० दिवस तिच्यासाठी खडतर असल्याचे तिने सांगितले आहे.
हिनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हिनाने काळ्या रंगाची टोपी घातली आहे. तसेच निळ्या रंगाची शाल अंगावर घेतली आहे. तसेच हिनाचा हातात कॉफीचा मग दिसत आहे. हा फोटो शेअर करत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मागील १५-२० दिवस शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप कठीण होते, असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
'गेले १५-२० दिवस माझ्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप कठीण होते. जखमा आल्या आणि मी न घाबरता त्यांचा सामना केला. शेवटी मी शारिरीक सीमांच्या आणि मानसिक आघाताला कशी बळी पडले असते. मी त्यांच्याशी लढले आणि लढत राहिन. या सगळ्या वेदनांतून बाहेर पडण्यासाठी सकारात्मकतेचे चक्र चालू ठेवण्यासाठी मला जबरदस्तीने हसत समतोल साधण्याची गरज आहे... खरा आनंद मिळेल या आशेने मी सर्व गोष्टी करत आहे' असे हिना म्हणाली.
हा माझा तुम्हा सर्वांना आणि स्वत:ला संदेश आहे. आयुष्य फक्त काम करते असे सांगून चालत नाही, परिस्थितीची पर्वा न करता आपल्याला दररोज, पुन्हा पुन्हा निवड करावी लागते. मला आशा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही अडचणींमधून जात असाल, तुम्हालाही अशी ताकद मिळेल. आशा करतो की आपण सर्व जण विजयी होऊ! असे हिना म्हणाली.
वाचा: शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यात आणखी दोन मजल्याची पडणार भर; गौरी खानचा राज्य सरकारकडे अर्ज
हिना खानच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने इतक्या कठीण काळातही ती सकारात्मक विचार करत असल्याने कौतुक केले. दुसऱ्या एका यूजरने, "तुमची पुढची पोस्ट अशी असेल की तुम्ही कॅन्सरवर मात केली आहे" असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने, 'तू सर्वांसाठीच एक प्रेरणा आहेस' अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या युजरने लिहिले की, तू माझा रोल मॉडेल आहेस, क्यूट शेर खान.
संबंधित बातम्या