मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सगळे होते, फक्त मीच नव्हते; cannes मधील ‘त्या’ प्रकाराने अभिनेत्री संतापली
हिना खान
हिना खान (HT)
20 May 2022, 10:45 AM ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
20 May 2022, 10:45 AM IST
  • हिना खानने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये भेदभाव केला जातो असा खळबळजनक खुलासा केला आहे

जगातील सगळ्यात जुना आणि मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे कान्स फिल्म फेस्टिव्हल. या फेस्टिवलला मंगळवारी सुरुवात झाली. ७५ वर्षांपासून चालत आलेल्या या फेस्टिवलला काही बॉलिवूड अभिनेत्रींनी हजेरी लावली. या यादीमध्ये छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खानचा देखील समावेश आहे. पण हिनाला इंडियन पविलियन ओपनिंगला एण्ट्री न मिळाल्याने संताप व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

हिना खानने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये भेदभाव केला जातो असा खळबळजनक खुलासा केला आहे. हिनाला तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर लॉंच करायचे होते. तेथील लोकांना याबाबत माहिती देखील होती. पण तरी सुद्धा तिला प्रेक्षकांमध्ये सुद्धा बसण्याची संधी मिळाली नाही.

याविषयी बोलताना हिना म्हणाली, आपण सगळेच चित्रपटसृष्टीशी जोडले गेलेलो आहोत. तेथे जाऊन सर्वजण भारताचे प्रतिनिधीत्व करत होते. त्यांना माहिती होते मी इंडियन पविलियनमध्ये येणार. मला पोस्टर लाँच करायचे होते. मी खूप उत्सुक होते. पण त्यांच्या सिस्टममध्ये भेदभाव केला जातो. ओपनिंग सेरेमनीमध्ये सर्वजण तेथे उपस्थित होते फक्त बॉलिवूडच नाही तर गायक आणि इतर काही लोक देखील. पण मला तेथे एण्ट्री मिळाली नाही. तेथे सगळे होते पण मीच नव्हते.

पुढे हिना म्हणाली, मला ऑडियन्समध्ये देखील येऊ दिले नाही. जर येऊ दिले असते तर मी त्यांना प्रोत्साहन दिले असते. मी यासाठी सेलिब्रिटींना दोष देत नाही. ज्यांनी या सर्वाचे नियोजन केले त्यांची ही चूक आहे. कदाचित पुढच्या वर्षी मी सहभागी होईन.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook