टीव्ही अभिनेत्री हिना खानला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती समोर आली होती. हिनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कॅन्सर झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. हिना खान लवकर बरी व्हावी, यासाठी इंडस्ट्रीतील अनेकांनी पाठींबा देत पोस्ट शेअर केल्या होत्या. आता उपचार घेत असताना हिना पुन्हा कामावर रुजू झाली आहे. तिने काम करताना केमो थेरपीचे टाके लपवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेत्री हिना खानने कॅन्सरच्या उपचारादरम्यान काम करण्यास सुरुवात केली आहे. हिना खानने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ज्यात ती शूटिंग सेटवर मेकअप करताना दिसत आहे. हिना खानने व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तिच्यावर उपचार सुरू आहेत पण त्याचवेळीच तिने काम करण्यास सुरुवाच केली आहे. यामुळे हिनाला आनंद मिळत आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हिना खान केमो थेरपीचे टाके लपवताना दिसत आहे. तसेच तिला तिचा मेकअप आर्टिस्ट धीर देताना दिसत आहे.
हिना खानने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने, "कॅन्सरच्या निदानानंतर माझे पहिले काम आहे. जीवनातील आव्हानांना सामोरे जाणे सोपे नसते, विशेषत: जेव्हा आपण जीवनातील सर्वात मोठ्या आव्हानांना सामोरे जात असतो. त्यामुळे तुमचे दिवस वाईट जात असतील तर क्षणभर थांबा, विश्रांती घ्या. हरकत नाही. तुम्ही विश्रांतीसाठी पात्र आहात. तसेच, आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांमध्ये हे क्षण पुन्हा जिवंत करण्यास विसरू नका. हे क्षण कितीही छोटे असले तरी. तरीही या दिवसांना खूप महत्त्व आहे" असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: लग्नात धोनीला मिठी मारणाऱ्या राधिका मर्चंटपेक्षा रणवीर-दीपिकाची जोरदार चर्चा, काय आहे कारण?
पुढे हिना म्हणाली, "जेव्हा मी काम करतो तेव्हा मला आनंद मिळतो. बदल स्वीकारा, फरक स्वीकारा आणि त्याला दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. मी चांगल्या दिवसांची वाट पाहते कारण मला जे करायला आवडते ते मला आनंद देते. जेव्हा मी काम करते तेव्हा मी माझी स्वप्ने जगते आणि हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे"
संबंधित बातम्या