'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून प्रसिद्ध झालेली टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात आहे. काही दिवसांपूर्वी हिना खानने आपल्या चाहत्यांना सांगितले होते की, तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला असून ती त्या वर उपचार घेत आहे. यानंतर हिना वेळोवेळी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांना तिच्या तब्येतीबद्दल आणि तिला कोणत्या परिस्थितीतून जात आहे याची माहिती देते. आता हिना खानने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती डोक्यावरील केस काढताना दिसत आहे.
हिना खानने तिच्या इन्स्टाग्रामवर केस कापतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिला काळजी घेण्यास सांगितले होते. आता हिना खानने एक मोठं पाऊल उचललं आहे. हिना खानने टक्कल करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हिना तिच्या आयुष्याविषयी देखील बोलताना दिसत आहे. कोणत्या मानसिक त्रासातून जात आहे याविषयी ती बोलताना दिसत आहे.
हिना खानने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती ट्रिमरने डोक्यावरचे केस काढताना दिसत आहे. कारण ट्रीटमेंट सुरु असताना केस हातात असल्याचे देखील तिने दाखवले आहे. केस हातात येत असल्यामुळेच तिने टक्कल केल्याचे म्हटले आहे.
व्हिडीओमध्ये हिना बोलताना देखील दिसत आहे. ती तिच्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. हे दु:ख जेव्हा तुम्ही स्वत:च्या मिठित घ्यास, आत्मसात कराल तेव्हाच तुम्ही यातून जिंकू शकता. आणि मी माझ्या लढाईच्या जखमा स्वीकारते. मला वाटते की जेव्हा आपण ते स्वीकारता तेव्हा आपण बरे होण्याच्या एक पाऊल जवळ येतो. आणि मला खरोखर माझ्या आयुष्याच्या त्या बाजूवर लक्ष केंद्रित करायचे आहे असे हिना बोलताना दिसली.
हिना खान पुढे म्हणाली की, मला त्या क्षणाची वाट पाहायची नाही जिथे केसात हात घातल्यावर मूठभर केस हातात येत आहेत. हे खूप तणावपूर्ण आहे, खूप निराशाजनक आहे. मला त्यातून जायचे नाही. त्याआधी माझ्या नियंत्रणात असलेली पावले मला उचलावी लागतील. मला असेही वाटते की जर तुमचे मानसिक आरोग्य योग्य चांगले असेल तर तुमचे शारीरिक आरोग्य त्यापेक्षा १० पट चांगले आहे. मानसिक आरोग्य माझ्या हातात आहे. या प्रवासात मला शारीरिक त्रास होईल, पण मला मानसिकदृष्ट्या मजबूत व्हायचे आहे. त्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे.
वाचा: 'तुम सब उसको डरा सकते हो, हरा नहीं सकते', उत्कर्ष शिंदेचा गोलिगत सूरज चव्हाणला पाठिंबा
या व्हिडीओमध्ये हिना खान भावूक होताना दिसत आहे. या व्हिडिओवर सेलेब्स आणि चाहते कमेंट करुन ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. हिना खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून चाहत्यांना कॅन्सरची बातमी दिली. आता ती तिच्या प्रकृतीविषयी देखील माहिती देताना दिसते.
संबंधित बातम्या