'तेरा सुरुर' या एका गाण्याने रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला बॉलिवूड गायक म्हणजे हिमेश रेशमिया. एक काळ असा होता की हिमेश रेशमियाच्या गाण्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. त्याचे प्रत्येक गाणे सुपरहिट ठरत होते. करिअर यशाच्या शिखरावर असताना हिमेशच्या खासगी आयुष्याविषयी विशेष चर्चा रंगल्या होत्या. आज २३ जुलै रोजी हिमेशचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...
हिमेश रेशमियाने जेव्हा इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले तेव्हा तो विवाहित होता. त्याच्या पत्नीचे नाव कोमल असे होते. जवळपास २२ वर्षे कोमल आणि हिमेश यांचा संसार सुरु होता. पण काही दिवसांनंतर हिमेशच्या मनात कोमलची मैत्रीण सोनिया कपूरविषयी भावना निर्माण झाल्या. सुरुवातीला अनेकांनी हिमेशला विरोध केला होता. मात्र आज तो सुखी संसार करत आहे. हिमेश रेशमियाने दुसऱ्या प्रेमासाठी २२ वर्षांचा संसार मोडला. महत्त्वाचे म्हणजे पतीच्या सुखासाठी हिमेश रेशमियाच्या पत्नीने म्हणजेच कोमलने त्याला घटस्फोट दिला. विवाहीत असताना देखील हिमेश त्याच्या पत्नीची मैत्रिण सोनिया कपूरच्या प्रेमात पडला. सोनिया ही चांगली अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
हिमेश राहात असलेल्या बिल्डींगमध्येच सोनिया राहात होती. त्यामुळे सोनियाचे कोमलच्या घरी सतत येणे जाणे असायचे. कोमलमुळेच हिमेश आणि सोनियाची भेट झाली. पण कोमलला जरा ही कल्पना नव्हती की जवळच्या मैत्रिणीमुळेच तिचा संसार मोडेल. सोनिया आणि हिमेश यांनी २००६ मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. पण पतीच्या अफेअरबद्दल कोमलला काहीही माहिती नव्हतं. हिमेश सोनियाच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला होता. २०१७मध्ये अखेर कोमलने हिमेशला घटस्फोट दिला.
वाचा: अभिनेता आर. माधवन याची कमाल! व्यायामाशिवाय २१ दिवसांत कमी केलं वजन, असं काय केलं?
एका मुलाखतीमध्ये हिमेशने कबूली दिली होती की त्याने एकमेकांच्या परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. कोमल आणि हिमेशला एक मुलगाही आहे, ज्याची काळजी दोघेही घेत आहेत. तेव्हा हिमेश त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आला होता.
हिमेश रेशमिया सध्या काय करतो असा प्रश्न सर्वांना पडला आहे. २०२१मध्ये हिमेशने रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम करण्यास नकार दिला. त्यानंतर तो कुठेही दिसला नाही. त्याने स्वत:च्या प्रकृतीवर लक्ष देण्यास सुरुवात केली. तसेच काही दिवसांपूर्वी तो अनंत अंबानीच्या लग्नात गाणे गाताना दिसला.
संबंधित बातम्या