सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींची यादी नुकताच समोर आली आहे. या यादीमध्ये २०२४ या वर्षात भारतात सर्वाधिक कर भरलेल्या कलाकरांची नावे जाहिर करण्यात आली आहेत. या यादीमध्ये बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचे नाव अग्रस्थानी आहे. थलापति विजय दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत क्रिकेटपटू विराट कोहलीचेही नाव आहे. या सेलिब्रिटींनी आर्थिक वर्ष २०२४ मध्ये किती टॅक्स भरला आहे हे सांगितले आहे.
फॉर्च्युन इंडियाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ९२ कोटी रुपयांचा कर भरला आहे. शाहरुखनंतर दाक्षिणात्य सुपरस्टार थलापति विजयचं नाव या यादीत आहे. तामिळ सुपरस्टारने ८० कोटी रुपयांचा कर भरला आहे. तर सलमान खान या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने ७५ कोटी रुपयांचा कर भरला आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे नेहमीच चर्चेत असतात. 'कल्की २८९८' मधील त्यांचे काम लोकांना खूप आवडले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली. अमिताभ यांनी २०२४ या आर्थिक वर्षात ७१ कोटी रुपयांचा कर भरला आहे. तर क्रिकेटपटू विराट कोहली ६६ कोटी रुपयांचा कर भरून या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत फक्त विराट कोहली, एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकर यांची नावे देखील टॉप १० मध्ये आहेत. धोनीने ३८ कोटी रुपये कर भरला आहे तर सचिन तेंडुलकरने २८ कोटी रुपयांचा कर भरला आहे. इतर क्रीडापटूंची नावे कर यादीमध्ये टॉप २० मध्ये आहेत. 'फायटर' अभिनेता हृतिक रोशन २८ कोटी रुपयांच्या कर भरणासह या यादीत दहाव्या स्थानावर आहे. ही यादी पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.
वाचा: वन नाईट स्टँडपासून सुरू झाली 'या' कपलची लव्हस्टोरी, अभिनेत्रीने केले आहे शाहरुखसोबत काम
येत्या काही वर्षात शाहरुखचे एकापोठापाठ एक असे पाच ते सहा चित्रपट लाइनअप आहेत. शाहरुख खानच्या 'किंग' या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे, मात्र चाहत्यांना सलमान खान आणि शाहरुख खान पुन्हा एकदा एकत्र येण्याची प्रतीक्षा आहे. 'टायगर विरुद्ध पठाण' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. भारतीय लष्कराने सिएरा लिओनच्या बंधनातून सुटका करण्यासाठी २००० साली मोहीम राबवली होती. या मोहिमेला 'ऑपरेशन खुकरी' असे नाव देण्यात आले. यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'चक दे इंडिया २', 'पँथर', 'इजहार' आणि इतर काही चित्रपट येणार आहेत.