रिंकू राजगुरू हे नाव आज अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला माहित आहे . अर्थात पहिल्याच सिनेमामध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळवून तिने तिच्या कामाची पोचपावती सुद्धा दिली होती . 'सैराट'सारख्या वास्तववादी चित्रपटात काम करत रिंकूने सर्वांची मने जिंकली. रिंकूच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. नुकताच रिंकूने स्वत: खासगी आयुष्यावर वक्तव्य केले आहे.
रिंकू ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवरील 'आस्क मी अ क्वेशन'च्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारल्या. त्यावेळी एका चाहत्याने रिंकूला 'तुझ्या बॉयफ्रेंडचे नाव काय आहे?' असा प्रश्न विचारला. त्यावर रिंकूने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. "बॉयफ्रेंड नाहीये त्यामुळे नाव पण नाहीये" असे रिंकू म्हणाली.
वाचा: 'प्रभु श्रीराम, मला माफ करा!', रणवीर शौरीने का मागितली माफी?
रिंकूने काही दिवसांपूर्वी तिच्या आगामी चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली होती. तिचा 'आशा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामधील लूकचा फोटो रिंकूने सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये रिंकू ही हिरवी साडी,गळ्यात मंगळसूत्र आणि चेहऱ्यावर स्माईल अशा लूकमध्ये दिसली. तसेच ती अभिनेता ललित प्रभाकरसोबत 'खिल्लार' या चित्रपटात देखील दिसणार आहे.‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटांतही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली होती. त्यासोबतच तिची १०० डेज ही सीरिज देखील आली होती.