छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' पाहिली जाते. या मालिकेतील अब्दुल हा त्याचे दुकान विकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अब्दुल दुकान विकणार म्हणजे मालिका सोडणार असे म्हटले जात होते. पण आता याबाबत माहिती समोर आली आहे. अब्दुल त्याचे दुकान नेमके कशासाठी विकत होता यामागचे कारण स्पष्ट झाले आहे.
नुकत्याच झालेल्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या एपिसोडमध्ये टपू सेनेने मटकी फोड स्पर्धा जिंकून ११ लाखांहून अधिक रुपये जिंकले आहेत. ते अब्दुलला ही आनंदची बातमी सांगतात. संपूर्ण गोकुळधाम सोसायटी अब्दुलकडे जाऊन त्याला खुशखबर देणार आहे. तसेच त्याला दुकान विकण्यापासून रोखणार आहेत. आजच्या एपिसोडमध्ये हे स्पष्ट होणार आहे की अब्दुल आपले दुकान का विकणार आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये गोकुळधामचे रहिवासी अब्दुलच्या दुकानाबाहेर उभे राहून त्याला दुकान का विकत आहेत, अशी विचारणा करतात. मग अब्दुल त्याच्या गावच्या रहीम चाचाबद्दल सांगतो. 'रहीम चाचांनी मला आणि माझ्या कुटुंबीयांना नेहमीच मदत केली आहे. हे दुकानही त्यांनीच मला गिफ्ट केले आहे. पण करोना काळात त्यांचा मृत्यू झाला. आता त्यांच्या मुलीच्या शिक्षणसाठी १० लाख रुपयांची गरज आहे. तिला मदत करण्यासाठी मी दुकान विकत आहे' असे अब्दुल म्हणाला.
अब्दुलने घेतलेल्या निर्णयाने गोकुळधाम सोसायटीमधील सर्वजण आनंदी झाले आहेत. त्यांनी अब्दुलच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. तसेच आधी याबाबत का नाही सांगितले? असा देखील प्रश्न विचारताना दिसतात. जर अब्दुलने याविषयी आधी सांगितले असते तर लवकर मदत केली असती असे देखील काहींनी म्हटले आहे. मात्र, टपू सेनेच्या विजयाने गोकुळधाममधील तणावाचे वातावरण संपुष्टात आले असून आनंदाचे परतावे लागले आहे. आता ही टप्पू सेना अब्दुलला त्याचे दुकान विकण्यापासून थांबवणार आहेत त्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे.
वाचा: अरबाजच्या जागी सूरज असता तर निक्कीला काय म्हणाला असता? 'माझ्या बच्चा' पाहा मजेशीर व्हिडीओ
तारक मेहताच्या आगामी भागात आता गोकुळधाममध्ये गणेश चतुर्थीची तयारी सुरू होणार आहे. या तयारीदरम्यान तुम्हाला मालिकेतील कलाकार भरपूर हसवणार आहेत. अब्दुलच्या दुकानाची समस्या सोडवल्यानंतर आता गोकुळधाममध्ये कोणता नवा पेच निर्माण होणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.