आपल्या अदांनी, सौंदर्याने आणि नृत्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. ती बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडच्या या धकधक गर्लला पाहण्यासाठी आजही चाहत्यांची झुंबड उडते. आज १५ मे रोजी माधुरीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया माधुरी विषयी काही खास गोष्टी...
एकेकाळी माधुरीने संपूर्ण बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. ९०च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध अभिनेते माधुरीच्या मागे लागले होते. पण माधुरीने १९९९ साली डॉक्टर श्रीराम नेनेशी लग्न केले. पण तुम्हाला माहिती आहे का माधुरीसाठी गायक सुरेश वाडकर यांचे स्थळ आले होते. पण सुरेश वाडकरांनी माधुरीला थेट नकार दिला होता. त्यांनी माधुरीला नकार देण्यामागे काय होते कारण चला जाणून घेऊया...
वाचा: १० फ्लॉप चित्रपटांनंतर राजकुमारचा 'श्रीकांत' ठरतोय हिट, जाणून घ्या चौथ्या दिवसाची कमाई
माधुरीचे कुटुंबीय हे पारंपरिक विचाराचे असल्यामुळे त्यांना माधुरीने चित्रपटांमध्ये काम करणे फारसे पसंत नव्हते. तिने फक्त घर आणि संसार सांभाळावा असा त्यांचा हट्ट होता. त्यामुळेच खूप आधीपासून तिचे वडील तिच्यासाठी स्थळ पाहात होते. वराच्या शोधात माधुरीचे वडील सुरेश वाडकर यांच्याकडे देखील माधुरीचे स्थळ स्थळ घेऊन पोहोचले होते. त्यावेळी वाडकरांनी संगीत क्षेत्रात स्वतःचे करिअर करण्यास नुकतीच सुरुवात केली होती.
वाचा: ‘सूर्यकांत कदम परत येतोय!’, अभिनेते भरत जाधव दिसणार मालिकेत, जाणून घ्या कोणत्या
माधुरीच्या आणि सुरेश वाडकर यांच्या वयात जवळपास १२ वर्षांचा फरक होता. त्यावेळी वाडकरांनी माधुरीशी लग्नाचा प्रस्ताव मुलगी खूपच बारीक असल्याचे कारण देत नाकारला होता. त्यामुळे माधुरीचे वडील निराश होऊन घरी परतले होते. पण, त्यावेळी मिळालेल्या एक नकारामुळे माधुरीचे करिअर घडले आणि आज ती मोठी स्टार बनली. पुढे अनेकदा माधुरीच्या चित्रपटांसाठी सुरेश वाडकरांनी पार्श्वगायनाचे काम केले.
वाचा: '३ तास वेगवेगळ्या बूथवर जाऊन नाव शोधले', मतदार यादीतून अभिनेता सुयश टिळकचे नाव गायब
या सर्व घटनेनंतर माधुरीने स्वत:च्या करिअरवर लक्ष देण्याचे ठरवले. तिने १९८४ मध्ये ‘अबोध’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण केले. १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून माधुरीने परदेशात संसार थाटला. माधुरीला दोन मुलगे आहेत. आता ती भारतात आली असून डान्स दिवाने या शोमध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे.