दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे नयनतारा. 'लेडी सुपरस्टार' अशी नयनताराची ओळख आहे. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालेला 'जवान' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. पण आता तिचा हा चित्रपट शेवटचा ठरला आहे.
टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, 'जवान' या चित्रपटात शाहरुख खान आणि नयनतारा दोघेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. मात्र चित्रपटाच्या यशाचे कारण केवळ आणि केवळ शाहरुख खान असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे नयनताराचे चाहते नाराज झाले आहेत. तसेच नयनताराला ऑफर करण्यात आलेला रोल हा चित्रपटात आणखी छोटा करण्यात आला. या गोष्टीमुळे नयनताराने यापुढे बॉलिवूडमध्ये काम करणार नसल्याचे सांगितले आहे.
वाचा: 'या' अभिनेत्याला सारा आणि अनन्याने केले एकाच वेळी डेट, करणने खोलली पोल
समोर आलेल्या माहितीनुसार, नयनताराने आता तिचा निर्णय घेतला आहे. ती यापुढे केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये काम करणार आहे. कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाची ऑफर आली तरी ती स्विकारणार नसल्याचे नयनताराने सांगितले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नयनताराने देखील यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
काही दिवसांपूर्वी नयनतारा संजय लीला भन्साळींच्या ऑफिस बाहेर दिसली होती. तिच्यासोबत संजय दत्त देखील दिसला. त्यामुळे संजय लीला भंसाळी यांच्या 'बैजू बावरा' या चित्रपटात नयनतारा आणि संजय दत्त दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता नयनताराने घेतलेला हा निर्णय ऐकून ती भंसाळींच्या चित्रपटात काम करणार की नाही? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.