बॉलिवूडचा दबंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानचे कुटुंबीय कायमच चर्चेत असतात. आज ४ ऑगस्ट रोजी सलमानचा भाऊ अरबाज खानचा वाढदिवस आहे. सलमान हा कायम त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. पण त्याची भावंडे खासगी आयुष्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. त्यामध्ये अरबाजचे नाव हे पहिल्या क्रमांकावर आहे. अरबाजने चित्रपटांमध्येही मुख्य भूमिकेपेक्षा सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका उत्तम पद्धतीने निभावल्या. अरबाजचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिलं. मलायकासोबत लग्न इथपासून त्यांच्या घटस्फोटापर्यंत तो नेहमीच हेडलाईनमध्ये राहिला. आता त्याने दुसरे लग्न केले असले तरी पहिल्या पत्नीसोबत असलेल्या नात्याच्या कायम चर्चा रंगतात.
अरबाज आणि मलायका यांची पहिली भेट ही एका कॉफीच्या जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. बोलणं वाढलं आणि त्याचं प्रेमात रूपांतर झालं. खूप वेळ एकमेकांना डेट केल्यानंतर मलायका आणि अरबाज यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९९८ साली त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांना अरहान नावाचा एक मुलगा देखील आहे. परंतु, त्यांच्या नात्याला जणू कुणाची नजर लागली अन त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २०१७ साली ते एकमेकांपासून वेगळे झाले. मात्र त्यांच्या घटस्फोटामागचं खरं कारण आजही कुणाला ठाऊक नाही.
असे म्हटले जाते की मलायकाला पुन्हा एकदा मॉडेलिंगमध्ये पदार्पण करायचे होते. मात्र त्याला घरच्यांचा विरोध होता. लग्न झाल्यावर मलायका तब्बल २० वर्ष बॉलिवूडमधून गायब होती ती एक गृहिणी बनून घर सांभाळत होती. तिने 'छय्या छय्या' गाण्यावर जबरदस्त नृत्य करून प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली होती. मात्र लग्नानंतर ती चित्रपटसृष्टीतून गायब झाली. अरहान मोठा झाल्यानंतर तिने पुन्हा एकदा आपले करिअर निवडले. त्यांच्या घटस्फोटानंतर अशा अनेक कारणांचा अंदाज लावण्यात आला. आता अरबाजने मेकअप आर्टिस्ट शौरा खानशी निकाह केला. तर दुसरीकडे मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा: 'हापशीवर होणाऱ्या भांडणापेक्षा हे बेकार', अभिनेत्याची सूरजला पाठिंबा देत नवी पोस्ट
अरबाज आणि शौराची पहिली भेट अभिनेत्याचा आगामी चित्रपट 'पटना शुक्ला'च्या सेटवर झाली. दोघांचेही एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. त्यांनी २४ डिसेंबर रोजी काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न केले.