मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Horror Web series: हॉरर चित्रपट पाहून भीती वाटत नाही? मग नेटफ्लिक्सवरील 'या' ५ सीरिज नक्की पाहा

Horror Web series: हॉरर चित्रपट पाहून भीती वाटत नाही? मग नेटफ्लिक्सवरील 'या' ५ सीरिज नक्की पाहा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 11, 2024 11:00 AM IST

Horror Web Series On OTT: या आठवड्यात घर बसल्या काही हॉरर वेब सीरिज पाहण्याचा प्लान करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नक्की वाचा...

Horror Web series
Horror Web series

करोना काळानंतर प्रेक्षकांना घर बसल्या अनेक चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्यासाठी सवय लागली आहे. तसेच ओटीटीवरही नवनव्या विषयांवर आधारित सीरिज येताना दिसतात. जर तुम्ही हॉरर चित्रपटपाहून कंटाळले असाल तर या पाच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या वेब सीरिज नक्की पाहा...

या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर डार्क ही सीरिज आहे. या सीरिजला IMDbने ८.७ रेटिंग दिली आहे. शहरातील दोन मुले गायब होण्यापासून या सीरिजची सुरुवात होते. त्या मुलांचा शोध घेताना त्या शहराचे अतिशय भयानक सत्य सर्वांनसमोर येते.
वाचा: माधुरीचा 'पंचक' हिट की सुपरफ्लॉप? वाचा बॉक्स ऑफिस कलेक्सशन

हॉरर वेब सीरिजच्या यादीमध्ये Gyeongseong Creature ही सीरिज देखील आहे. या सीरिजला आयएमडीबीने ७.४ रेटिंग दिली आहे. या सीरिजची कथा १९४५ जन्माला आलेल्या अशा राक्षसाची कथा आहे जो मानवांचे जगणे मुश्कील करुन टाकतो. सर्वजण आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात.

स्वीडनच्या जंगलात सुट्टीसाठी गेलेले चार मित्र हरवल्याची कहाणी दाखवण्यात आली. हळूहळू जंगतालाचे भीतीदायक सत्य त्यांच्या समोर येते आणि त्यांना धक्का बसतो. घर बसल्या ही सीरिज पाहणे योग्य पर्याय ठरु शकतो.

द हंटिंग ऑफ हिल हाऊस ही सीरिज अतिशय हॉरर आहे. आयएमडीबीने या सीरिजला १० पैकी ९ रेटिंग दिले आहे. या सीरिजची कथा भीतीदायक आहे आणि अशा रोलर कोस्टर राइडमध्ये बसवते की पाहून तुम्हीही आवाक व्हाल.

WhatsApp channel

विभाग