भारताचे सिक्रेट्स पाकिस्तानला पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांची कथा, 'फकाट'चा टीझर प्रदर्शित
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  भारताचे सिक्रेट्स पाकिस्तानला पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांची कथा, 'फकाट'चा टीझर प्रदर्शित

भारताचे सिक्रेट्स पाकिस्तानला पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांची कथा, 'फकाट'चा टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Apr 06, 2023 12:29 PM IST

Phakaat Teaser: फकाट या चित्रपटाच्या टीझरमध्ये हेमंत ढोमेची भूमिका पाहण्यासारखी आहे.

फकाट
फकाट

प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके आणि मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. आता पुन्हा एकदा एक भन्नाट चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'फकाट' या आगळ्यावेगळ्या नावाचा चित्रपट हायली कॉन्फिडेन्शिअल धिंगाणा घालायला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून नुकतेच या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले आहे.

चित्रपटाच्या नावावरूनच हा अफलातून चित्रपट असल्याचे दिसतेय. टीझरच्या सुरुवातीलाच आतंकवादी आणि सैनिकांची चकमक, अंगावर शहारे आणणारा गोळीबाराचा आवाज आणि या दरम्यान एक हायली कॉन्फिडेन्शिअल माहिती असणारी एल. ओ. सी. फाईल उघडताना दिसत असून, यात सैनिकाच्या वेशात नितीश चव्हाण दिसत आहे. एका बाजूला असे संवेदनशील चित्र दिसत असतानाच दुसऱ्या बाजूला हेमंत ढोमे (सलीम) आणि सुयोग गोऱ्हे (राजू) या जिगरी दोस्तांची धमाल, मस्तीही दिसत आहे. अचानक या दोघांच्या हातात ती फाईल पडते आणि त्यांच्या डोक्यात एक जबरदस्त कल्पना येते. या स्वप्नांच्या दुनियेत जगत असतानाच त्यांच्या आयुष्यात पुढे काय काय घटना घडतात, त्यातून ते दोघे कसा मार्ग काढतात, पुढे त्या फाईलचं काय होतं? ती फाईल घेऊन ते दोघे कुठे जातात? या सगळ्या प्रश्नांचा उलगडा चित्रपट पाहिल्यावरच होणार आहे.
वाचा; 'बलोच'मध्ये दिसणार मराठ्यांची असीम शौर्यगाथा, नव्या मोशन पोस्टरने वेधले सर्वांचे लक्ष

वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित, १९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात झळकणाऱ्या या 'फकाट'च्या निमित्ताने हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे ही जोडगोळी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. याशिवाय या चित्रपटात अविनाश नारकर, नितीश चव्हाण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Whats_app_banner