Jhimma 2 Teaser: निमित्त इंदू डार्लिंगचा ७५वा वाढदिवस; 'झिम्मा २'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jhimma 2 Teaser: निमित्त इंदू डार्लिंगचा ७५वा वाढदिवस; 'झिम्मा २'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

Jhimma 2 Teaser: निमित्त इंदू डार्लिंगचा ७५वा वाढदिवस; 'झिम्मा २'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Oct 24, 2023 06:54 PM IST

Hemant Dhome: सध्या सोशल मीडियावर 'झिम्मा २' चित्रपटाचा टीझर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आता चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Jhimma 2
Jhimma 2

दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘झिम्मा’ हा चित्रपट एक वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा हटके विषय, तगडी स्टारकास्ट या सर्वामुळे चित्रपटाने बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रसिकांना हा चित्रपट आपल्या आयुष्याशी खूप साधर्म्य साधणारा वाटला त्यामुळेच जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले. सिनेरसिकांच्या याच प्रेमामुळे हेमंत ढोमे ‘झिम्मा २’ घेऊन येत आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘झिम्मा २’ चित्रपटाच्या १ मिनिटे ४ सेकंदाच्या टीझरमध्ये सिद्धार्थ चांदेकर पु्न्हा एकदा नव्या ट्रीपचे आयोजन करतो. यावेळी निमित्त असते इंदू डार्लिंगचा वाढदिवस. इंदूला तिचा वाढदिवस तिच्या महिला गँगसोबत साजरा करायचा असतो. त्यामुळे या ट्रीपचे आयोजन करण्यात आले आहे. आता 'झिम्मा २'मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार हे चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर कळेलच. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वाचा: नाक कापून घ्यायला आलो नाही; अंकिताचे वागणे पाहून संतापला विकी

आनंद एल. राय आणि क्षिती जोग या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि सहनिर्माते आहेत विराज गवस, उर्फी काझमी, अजिंक्य ढमाळ. आता झिम्मा २मध्ये कोणते कलाकार दिसणार? कोणत्या देशात या चित्रपटाचे चित्रीकरण होणार? हे सर्व गुपित ठेवण्यात आले आहे. लवकरच याबाबत घोषणा होणार आहे. काही दिवसांपूर्वी 'झिम्मा २' हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात होते. आता चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Whats_app_banner