Hemant Dhome: हेमंत ढोमेने अशोक मामांचे गाणे केले रिक्रिएट, पाहा व्हिडीओ
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hemant Dhome: हेमंत ढोमेने अशोक मामांचे गाणे केले रिक्रिएट, पाहा व्हिडीओ

Hemant Dhome: हेमंत ढोमेने अशोक मामांचे गाणे केले रिक्रिएट, पाहा व्हिडीओ

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Apr 20, 2023 04:52 PM IST

Tujhi majhi jodi Jamli: 'तुझी माझी जोडी जमली' हे गाणे सुपरहिट गाणे पुन्हा एका प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हेमंत ढोमेने ते रिक्रिएट केले आहे.

hemant dhome
hemant dhome

चित्रपटसृष्टीमधील काही सिनेमे आणि गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करुन असतात. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचे 'तुझी माझी जोडी जमली' हे गाणे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आजही प्रेक्षक या गाण्यावर ठेका धरताना दिसतात. आता अभिनेता हेमंत ढोमेच्या 'फकाट' या चित्रपटात या गाण्याला रिक्रिएट करण्यात आले आहे.

श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' चित्रपटातील सगळे कलाकार समोर आल्यानंतर या चित्रपटातील एक जबरदस्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'तुझी माझी जोडी' असे गाण्याचे बोल असणाऱ्या हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे यांनी गायले असून शांताराम नांदगावकर आणि हर्ष, करण, आदित्य या 'ट्रिनिटी ब्रदर्स' यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. तर या गाण्याला 'ट्रिनिटी ब्रदर्स'चेच संगीत लाभले आहे. हेमंत ढोमे आणि अनुजा साठे यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे ऐंशीच्या दशकात नेणारे आहे. उडत्या चालीचे हे गाणे ऐंशीच्या काळातील सुपरहिट गाणे असून ते रिक्रिएट करण्यात आले आहे. हे रेट्रो लूकमधील गाणे पाहाताना आणि ऐकताना संगीतप्रेमींना त्याच काळात गेल्याचा अनुभव येईल.
वाचा: प्रदर्शनाच्या २० दिवसात भोलाची बक्कळ कमाई, पार करणार १०० कोटींचा आकडा?

'फकाट' या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयश जाधव करत असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. येत्या १९ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरमध्ये हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, कबीर दुहान सिंग, अनुजा साठे, रसिका सुनील, नितीश चव्हाण, किरण गायकवाड आणि महेश जाधव हे कलाकार दिसत आहेत. दमदार कलाकारांची फळी असलेला हा एक अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे.

Whats_app_banner