Phakaat: पैशांसाठी भारताचे सिक्रेट्स पाकिस्तानला देऊ पाहणाऱ्या तरुणांची कथा, 'फकाट'चा ट्रेलर प्रदर्शित
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Phakaat: पैशांसाठी भारताचे सिक्रेट्स पाकिस्तानला देऊ पाहणाऱ्या तरुणांची कथा, 'फकाट'चा ट्रेलर प्रदर्शित

Phakaat: पैशांसाठी भारताचे सिक्रेट्स पाकिस्तानला देऊ पाहणाऱ्या तरुणांची कथा, 'फकाट'चा ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Published May 04, 2023 01:05 PM IST

Phakaat Trailer: 'फकाट' या चित्रपटात हेमंत ढोमे महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलरमधील त्याची भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Phakaat Trailer
Phakaat Trailer

प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके आणि मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. आता पुन्हा एकदा एक भन्नाट चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'फकाट' या आगळ्यावेगळ्या नावाचा चित्रपट हायली कॉन्फिडेन्शिअल धिंगाणा घालायला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

ट्रेलरमध्ये भारत -पाक युद्ध, विनोद, प्रेम असे सगळेच पाहायला मिळत आहे. एलओसी सारखा गंभीर विषय असतानाच हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे यांची धमालही दिसतेय. घरच्यांनी आणि या दोघांनीही आपण काहीच करू शकत नसल्याची आशा सोडल्यानंतर अचानक हेमंत आणि सुयोगच्या हाती एक हायली कॅान्फिडेन्शिअल फाईल लागते आणि त्यानंतर ते त्या फाईलची काय विल्हेवाट लावतात, यादरम्यान त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते आणि त्यानंतर जो धिंगाणा होतो तो ‘फकाट’मध्ये पाहायला मिळणार आहे.
वाचा: 'मराठी सिनेमा संपवला जातोय', सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्यामुळे दिग्दर्शक संतापला

ट्रेलरमध्ये अभिजीत खांडकेकर याचीही झलक दिसत आहे. त्यामुळे आता त्याची यात काय भूमिका आहे, हे ‘फकाट’ पाहिल्यावरच कळेल. 'फकाट'च्या निमित्ताने कबीर दुहान सिंग मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. तो नकारात्मक भूमिकेत दिसत असून त्याचा एक वेगळाच दरारा या चित्रपटात दिसत आहे.

वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित, १९ मे रोजी चित्रपटगृहात झळकणाऱ्या या 'फकाट'च्या निमित्ताने हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे ही जोडगोळी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. याशिवाय या चित्रपटात अविनाश नारकर, नितीश चव्हाण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Whats_app_banner