हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठी कलाकारांसोबत समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट लवकरच १० कोटी रुपयांचा पल्ला पार करणार आहे. चला पाहूया चित्रपटाने सहाव्या दिवशी किती कमाई केली आहे.
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॅाक्स ॲाफिसवर कमाल कमाई केली आहे. सहा दिवसात चित्रपटाने ७ कोटी रुपयांचा पल्ला पार केला आहे. आता लवकरच चित्रपट १० कोटी रुपयांचा पल्ला पार करणार आहे. पहिल्या तीन दिवसातच चित्रपटाने ४ कोटी रुपये कमावले होते. त्यानंतर सहा दिवसांची कमाई पाहून चाहते आनंदी झाले आहेत.
वाचा: सुनील शेट्टीमुळे घाबरली होती करिश्मा कपूर, पोलिसांना बोलावण्याची आली होती वेळ
पहिला दिवस : ०.९५ कोटी
दुसरा दिवस : १.७७ कोटी
तिसरा दिवस : २.५ कोटी
चौथा दिवस : १.५ कोटी
पाचवा दिवस : ०.५५ कोटी
सहावा दिवस : ०.७० कोटी
दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘झिम्मा’ हा चित्रपट एक वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा हटके विषय, तगडी स्टारकास्ट या सर्वामुळे चित्रपटाने बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यापाठोपाठ 'झिम्मा २' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
संबंधित बातम्या