Jhimma 2 Box Office Collection: ‘झिम्मा २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसात कोट्यवधींची कमाई
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jhimma 2 Box Office Collection: ‘झिम्मा २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसात कोट्यवधींची कमाई

Jhimma 2 Box Office Collection: ‘झिम्मा २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसात कोट्यवधींची कमाई

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Nov 27, 2023 06:47 PM IST

Hemant Dhome Jhimma 2: हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे.

Jhimma 2
Jhimma 2

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठी कलाकारांसोबत समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तीन दिवसात किती कमाई केली आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर कमाल कमाई केली आहे. ‘झिम्मा २’ ने ४.७७ कोटींचा गल्ला जमवला असून या आकड्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे.
वाचा: अंकिता लोखंडेचा प्रेग्नंसी रिपोर्ट समोर, प्रेक्षकांना दिली आनंदाची बातमी

चित्रपटाला मिळणाऱ्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ‘’प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम सुखावणारे आहे. आम्ही अनेक थिएटर्सना भेट देत आहोत खूप ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. चित्रपट पाहून प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिक्रिया भारावणाऱ्या आहेत. हा भाग आधीच्या भागापेक्षा अधिक चांगला असल्याच्याही प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षक आवर्जून भेटायला येत असून सोशल मीडियावरही अनेकांचे संदेश येत आहेत. प्रेक्षकांकडून ‘झिम्मा २’वर होणारा कौतुकाचा वर्षाव भारी फिलिंग देणारा आहे.

दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘झिम्मा’ हा चित्रपट एक वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा हटके विषय, तगडी स्टारकास्ट या सर्वामुळे चित्रपटाने बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यापाठोपाठ 'झिम्मा २' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Whats_app_banner