'तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे...', आईने दिले अभिनेत्री हेमांगी कवीला सरप्राइज
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे...', आईने दिले अभिनेत्री हेमांगी कवीला सरप्राइज

'तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे...', आईने दिले अभिनेत्री हेमांगी कवीला सरप्राइज

Aarti Vilas Borade HT Marathi
Published May 12, 2024 03:17 PM IST

अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या आईने तिला सरप्राइज दिल्याचे दिसत आहे.

आईने दिले हेमांगी कवीला सरप्राइज
आईने दिले हेमांगी कवीला सरप्राइज

आज सगळीकडे मातृदिन साजरा केला जात आहे. सर्वसान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण मातृदिन साजरा करत आहेत. अनेकजण सोशल मीडियावर आईसोबतचा फोटो शेअर करताना दिसत आहेत. काही मुली त्यांच्या आईला सरप्राइज देतात. पण तुम्हाला माहिती आहे का मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीच्या आईने हेमांगीलाच सरप्राईज दिले आहे. हेमांगीने आईचा सरप्राईज देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

काय आहे हेमांगीचा व्हिडीओ?

हेमांगी सध्या सोनी वाहिनीवरील 'मॅडनेस मचाएंगे' या हिंदी कॉमेडी शोमध्ये दिसत आहे. या कॉमेडी शोमध्ये मदर्सडे स्पेशल एपिसोड करण्यात आला. त्यासाठी हेमांगीच्या आईने एक खा व्हिडीओ शूट करुन पाठवला होता. हा व्हिडीओ शोमध्ये दाखवताच हेमांगीला अश्रू अनावर झाल्याचे दिसत आहे.
वाचा: “लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला?”, केतकी चितळेची संतप्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनने वेधले लक्ष

हेमांगीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करत, "प्रत्येक आईचे आपल्या मुलांवर प्रेम असते. ते दाखवण्याच्या पद्धती वेगळ्या असतील पण मुल वाढवताना ती जे जे करते ते जगात कुणीच करू शकत नाही. पण जेव्हा हीच मुले मोठी होऊन अभिनय क्षेत्रासारखी जरा हटके, वेगळी वाट निवडतात ना तेव्हा त्या मुलांसोबत त्या आईचा ही स्ट्रगल सुरु होतो! हा व्हिडीओ पाहताना माझ्या आईचा सगळा struggle, तिचे कष्ट, तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे, घरातल्याच लोकांची पत्करलेली नाराजी, उघडउघड कधीच नाही पण नकळतपणे माझ्यात रूजवलेलं धैर्य, बळ आणि आज माझ्याबद्दल बोलताना तिचा भरून आलेला ऊर पाहून अत्यानंद झाला आणि माझा बांध फुटला! (Screen वर दिसणारं सगळंच scripted नसतं!)" असे म्हटले आहे.
वाचा: विकेंडला सिनेमा पाहण्यासाठी जाताय? मग जाणून घ्या 'श्रीकांत'ची पहिल्या दिवसाची कमाई

पुढे तिने सर्वांचे आभार मानात, "मदर्स डे निमित्ताने आज मी तिला सरप्राईज, गिफ्ट द्यायला हवे होते पण तिनेच मॅडनेस मचाएंगेच्या ‘मदर्स डे स्पेशल’ एपिसोडमध्ये हा व्हिडीओ पाठवून मला हे सरप्राइज आणि गोड गिफ्ट दिले! या व्हिडीओसाठी मी सोनीटीव्हीच्या संपूर्ण टीमचे आभार मानते! एवढ्या मोठ्या मंचावर पहिल्यांदाच माझी मम्मी दिसणार!" सध्या सोशल मीडियावर हेमांगीची ही पोस्ट चर्चेत आहे.
वाचा: प्रत्येक 'चौका'तला राडा प्रेक्षकांना पाहाता येणार घर बसल्या, जाणून घ्या कधी आणि कुठे?

Whats_app_banner