Hemangi kavi on Jhimma 2: 'झिम्मा २'पाहून हेमांगी कवीने केली दिग्दर्शकाकडे विनंती, पोस्ट चर्चेत
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hemangi kavi on Jhimma 2: 'झिम्मा २'पाहून हेमांगी कवीने केली दिग्दर्शकाकडे विनंती, पोस्ट चर्चेत

Hemangi kavi on Jhimma 2: 'झिम्मा २'पाहून हेमांगी कवीने केली दिग्दर्शकाकडे विनंती, पोस्ट चर्चेत

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Nov 30, 2023 07:06 PM IST

Hemangi Kavi Post: अभिनेत्री हेमांगी कवीची प्रत्येक पोस्ट चर्चेत असते. नुकताच तिने झिम्मा २ पाहून पोस्ट केली आहे. तिची पोस्ट चर्चेत आहे.

Hemangi kavi
Hemangi kavi

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठी कलाकारांसोबत समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घालताना दिसत आहे. अनेक कलाकार देखील हा चित्रपट पाहून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. नुकताच अभिनेत्री हेमांगी कवीने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

हेमांगी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत सामाजिक विषयांवर प्रतिक्रिया देताना दिसते. हेमांगीने झिम्मा २ विषयी केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टमध्ये हेमांगीने झिम्मा २ चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडे विनंती केली आहे.
वाचा: ‘झिम्मा २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसात कोट्यवधींची कमाई

काय आहे हेमांगीने सोशल मीडियावर पोस्ट?

हेमांगी झिम्मा २ पाहुन लिहीते, "मला तर बाई लय मंजी लय मज्जा आली! हेमंत ढोमे अरे काय कमाल सिनेमा आहे! Frankly speaking झिम्मा १ पेक्षा झिम्मा २ जास्त जमून आलाय. कदाचित या बायकंना आम्ही झिम्मा १ पासून ओळखत होतो म्हणून हे मला वाटलं असेल. प्रत्येकीची गोष्ट वेगळी पण तितकीच प्रभावी आणि relatable! विचार करायला लावणारी आणि आचरणात आणायला कुठेही कठीन न करता सहजपणे आपल्यात बदल करू शकणारी! खरंच मज्जा आली. प्रचंड enjoy केला मी हा सिनेमा!"

हेमांगी पुढे लिहीते, "निर्मीती सावंत!!!! काय करायचं या बाईचं! म्हणजे मला काही सुचेचना! कसं कसं करतेस गं तू! इतक्या वर्षांपासून कसं गं हे अबाधित ठेवलंयस? आपल्याकडे विशिष्ट वयानंतर अभिनेत्रीला lead किंवा Heroine म्हणून बघितलं जात नाही. पटकन चरित्र कलाकार, सहाय्यक कलाकार म्हणून आपण लगेच categories करतो. Hollywood किंवा इतर कुठेही असं होत नाही. मोठ्या वयाच्या अभिनेत्रींना Lead म्हणूनच पाहीलं जातं. Awards साठी main category मध्ये गणलं जातं. ही गोष्ट जर आपल्या इथं सुरू झाली तर त्याला तु कारणीभूत असशील ताई. इतकं भारी काम केलंयस तू! सुहास ताई, हीच गोष्ट ‘तु तिथं मी’ च्या वेळी वाटली होती. आणि आज ही तुमची इंदू पाहून वाटलं! तो line मारायचा scene! मी तर शिट्टीच हाणली theatre मध्ये. क्या बात है!"

पुढे रिंकूचे कौतुक करत हेमांगी म्हणाली, रिकुचं दुसरं कौतुक करावंसं वाटतं. खुप समजून- उमजून काम केलंय. Typical सून न करता एकदम छान तान्या साकारली आहे. Screen वर दिसताच आपसूक आमच्या चेहऱ्यावर smile येत होतं. थोडक्यात या सासू-सूनेने लयच धमाल आणलीए! एक एक scene चोपलाय तिघींनी! जाता जाता एवढंच सांगेन हेमंत ढोमे आता आम्हाला झिम्मा ३ हवाय. हवाय म्हणजे हवायययययय! ते तू बाकी सिनेमे करत रहा पण झिम्मा universe ला अंत देऊ नकोस! फार फार तर काय होईल एखादा part फसेल! ठिक आहे की. पण हा खेळ थांबवू नकोस एवढीच विनंती तुझ्या सगळ्या team कडे. इरावती कर्णिक - क्षितीज पटवर्धन कमाल कमाल! कमाल!"

दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘झिम्मा’ हा चित्रपट एक वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा हटके विषय, तगडी स्टारकास्ट या सर्वामुळे चित्रपटाने बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यापाठोपाठ 'झिम्मा २' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Whats_app_banner