Hema Malini Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार हेमा मालिनी यांनी बुधवारी मुंबईत एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हेमा मालिनी यांच्यासोबतच गायक अनुप जलोटा यांसारखे कलाकारही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एक व्हिडीओ बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांचा आहे. मात्हार, व्हिडिओ पाहिल्यानंतर आता सोशल मीडिया युजर्स हेमा मालिनी यांना ट्रोल करत आहेत. या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी आपल्या एका महिला फॅनने खांद्यावर हात ठेवल्याने अस्वस्थ होताना दिसल्या आहेत.
सेलिब्रिटी फोटो आणि व्हिडीओग्राफार विरल भयानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी आणि अनुप जलोटा एकत्र फोटोसाठी पोज देताना दिसले आहेत. तर, या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी यांच्यासोबत त्यांची एक महिला चाहतीही दिसत आहे. फोटो काढण्यासाठी ही चाहती हेमा मालिनी यांच्या खांद्यावर हात ठेवते. मात्र, तिने खांद्यावर हात ठेवताच अभिनेत्री थोडी चिडते आणि महिलेला आपल्या खांद्यावरून हात काढण्यास सांगते. या व्हिडीओमध्ये असेही दिसत आहे की, या दरम्यान एक पुरुष येतो आणि तो त्या महिलेला हेमा मालिनी यांच्पायासून दूर करण्याचा प्रयत्न करतो.
सोशल मीडियावर अभिनेत्री हेमा मालिनी यांचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओतील हेमा मालिनी यांचे वागणे लोकांना अजिबात आवडलेले नाही. या व्हिडीओखाली कमेंट करत लोक हेमा मालिनी यांना ट्रोल करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं की, ‘जेव्हा निवडणुकीच्या वेळी हे लोक त्यांच्या घरी भीक मागायला जातात तेव्हा हात नाही लावत का?’. तर, आणखी एका युजरने लिहिलं की, ‘अशा अहंकारी सेलेब्ससोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यांची चूक आहे.’ तर एका तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘निवडणुकीच्या वेळी जनतेने हे लक्षात ठेवावे.’
काही दिवसांपूर्वी हेमा मालिनी आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या होत्या. हेमा मालिनी यांनी विनेश फोगटच्या पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडण्यावर भाष्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. आता या व्हिडीओमुळे त्या खूप ट्रोल होत आहेत.