हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचं वैवाहिक आयुष्य आजही चर्चेत आहे. धर्मेंद्र यांनी आपली पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले होते. चित्रपटसृष्टीमधील ड्रीम गर्ल हेमा यांनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्यासाठी धर्मही बदलला. पण मुलींच्या जन्मानंतर लगेचच धर्मेंद्र हेमा यांना सोडून पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबत राहू लागले होते. पण त्यामागे नेमके काय कारण होते? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
हेमा मालिनी यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले होते की, धर्मेंद्र आता त्यांच्यासोबत नाही तर त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत राहतात याचे तुम्हाला वाईट वाटते का? तेव्हा हेमा मालिनी म्हणाल्या की, "मला याचं वाईट वाटत नाही आणि यामुळे मी दु:खीही नाही. मी स्वत:वर खूश आहे. मला दोन मुले आहेत आणि मी त्यांचे संगोपन खूप चांगल्या प्रकारे केले आहे. अर्थात ते (धर्मेंद्र) नेहमीच सर्वत्र आमच्यासोबत होते."
हेमा मालिनी यांनी पत्रकार-चित्रपट निर्माते राम कमल मुखर्जी यांनी लिहिलेल्या 'हेमा मालिनी : बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या आत्मचरित्रात धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीबद्दलही भाष्य केले होते. हेमा मालिनी यांनी सांगितले होते की, धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना आपण आजपर्यंत भेटलो नाही. याचं कारण सांगताना हेमा म्हणाली, 'मला कुणालाही त्रास द्यायचा नव्हता. धरमजींनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलींसाठी जे काही केले त्याबद्दल मी आनंदी आहे. वडिलांची भूमिका त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे साकारली होती. मला वाटते की मी त्याबद्दल आनंदी आहे. आज मी एक नोकरदार महिला आहे आणि मी माझे जीवन कला आणि संस्कृतीसाठी समर्पित केल्यामुळे मी माझी प्रतिष्ठा जपण्यात यशस्वी झाले आहे.
वाचा: अतुल परचुरेंबद्दल बोलताना निवेदिता सराफांना कोसळले रडू, शब्दही फुटत नव्हते
हेमा मालिनी यांनी पुढे सांगितले की, "धरमजींच्या पहिल्या पत्नीचा आपण खूप आदर करतो, असेही हेमा म्हणाल्या. प्रकाश यांच्याबद्दल मी कधीच बोलले नसले तरी मी त्यांचा खूप आदर करते. माझ्या मुलीही धरमजींच्या कुटुंबाचा आदर करतात. जगाला माझ्या आयुष्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. परंतु त्यांनी स्वतःच्या व्यवसायाकडे लक्ष दिले पाहिजे. "
संबंधित बातम्या