Hema Malini Birthday : कधीकाळी वजनामुळे मिळाला होता नकार; मग हेमा मालिनी बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ कशा बनल्या?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hema Malini Birthday : कधीकाळी वजनामुळे मिळाला होता नकार; मग हेमा मालिनी बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ कशा बनल्या?

Hema Malini Birthday : कधीकाळी वजनामुळे मिळाला होता नकार; मग हेमा मालिनी बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ कशा बनल्या?

Published Oct 16, 2024 08:26 AM IST

Happy Birthday Hema Malini : हेमा मालिनी यांनी कधीच अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. पण, आई जयलक्ष्मीच्या आग्रहावरून त्यांनी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

Hema Malini
Hema Malini

Hema Malini Birthday Special : बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आज त्यांचा ७६वा वाढदिवस साजरा करत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या मेहनतीच्या आणि कौशल्याच्या जोरावर चित्रपटसृष्टीत एक विशेष ओळख निर्माण केली आहे. हेमा मालिनी यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४८ रोजी तामिळनाडूमधील अम्मानकुडी येथे झाला होता. हेमा यांचे खरे नाव हेमा मालिनी चक्रवर्ती होते. चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपल्या नावातून चक्रवर्ती आडनाव काढून टाकले. पण, त्याचा हा इथवरचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी कधीच अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. पण, आई जयलक्ष्मीच्या आग्रहावरून त्यांनी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

हेमा मालिनी यांना करिअरच्या सुरुवातीला अनेकदा नकाराचा सामना करावा लागला होता. त्यावेळी हेमा खूपच सडपातळ होत्या आणि जेव्हाही त्या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी जायच्या, तेव्हा त्यांची अंगकाठी आणि वजन पाहूनच नकार दिला जायचा. एकदा त्यांना एका तमिळ चित्रपटासाठी साईन करण्यात आले होते. मात्र, चार दिवसांच्या शूटिंगनंतर त्यांना चित्रपटातून काढून टाकण्यात आले.

Sanjeev Kumar : संजीव कुमारला करायचे होते हेमा मालिनीशी लग्न, या कारणामुळे झाला ब्रेकअप

‘सपनो के सौदागर’ने पालटलं आयुष्य!

इतक्या अडचणींनंतरही हेमाने हार मानली नाही आणि स्वत:ला चित्रपटांसाठी आणि अभिनेत्री होण्यासाठी तयार केले. हेमा मालिनी यांनी शास्त्रीय नृत्य शिकण्यास सुरुवात केली आणि स्वतःच्या लूकवर काम केले. यानंतर त्यांना राज कपूर यांच्यासोबत ‘सपनो के सौदागर’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने हेमा मालिनी यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. लोकांना त्यांचा अभिनय खूप आवडला आणि त्यानंतर हेमा मालिनी यांना अनेक चित्रपट मिळू लागले.

१००हून अधिक चित्रपटांमध्ये केले काम!

हेमा मालिनी यांनी आपल्या करिअरमध्ये १००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी निम्म्याहून अधिक चित्रपट हिट ठरले आहेत. धर्मेंद्रसोबतचे त्यांचे ४० चित्रपट हिट ठरले आहेत. ‘सीता और गीता’मधील दुहेरी भूमिका आणि ‘शोले’मध्ये साकारलेल्या ‘बसंती’च्या भूमिकेसाठी लोक आजही त्यांचे कौतुक करतात. त्यांच्या मेहनतीने आणि टॅलेंटने त्यांना बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ बनवले. आजही हेमा मालिनी अभिनय क्षेत्रात आणि राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी नेहमीच आपल्या चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्याशी लग्न करून त्यांनी ईशा आणि आहाना अशा दोन मुलींना जन्म दिला.

Whats_app_banner