मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मल्लिकाजान पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नेटफ्लिक्सने केली 'हिरामंडी २'ची घोषणा

मल्लिकाजान पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नेटफ्लिक्सने केली 'हिरामंडी २'ची घोषणा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 03, 2024 04:55 PM IST

Heeramandi Season 2 : सध्या हिरामंडी ही संजय लीला भन्साळी यांची वेब स्टोरी चर्चेत आहे. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता नेटफ्लिक्सने या सीरिजच्या दुसऱ्या सिझनची घोषणा केली आहे.

Heeramandi: 'हिरामंडी २'ची घोषणा
Heeramandi: 'हिरामंडी २'ची घोषणा (HT_PRINT)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा प्रत्येक प्रोजेक्ट हा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. जवळपास सर्वच कलाकारांना त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असते. त्यामुळे 'हिरामंडी' या वेब सीरिजची घोषणा झाल्यापासूनच सर्वांमध्ये उत्सुकता होती. ही सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. आता या सीरिजच्या दुसऱ्या सिझनची घोषणा करण्यात आली आहे. हा चाहत्यांसाठी सुखद धक्काच आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

संजय लीला भन्साळी आणि नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये समुद्र किनारी काही महिला हिरामंडीमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे ड्रेस घालून डान्स करत आहेत. बॅकग्राऊंडला हिरामंडीमधील लोकप्रिय गाणी ऐकू येत आहेत. या महिला आनंदात असून नाचताना दिसत आहेत.
वाचा: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्रीवेडिंगमधील पहिला व्हिडीओ आला समोर, 'बॅकस्ट्रीट बॉईज'चा धम्माल परफॉर्मन्स

हिरामंडी २ची घोषणा

महिलांचा हा डान्स व्हिडीओ शेअर करत सर्वात शेवटी हिरामंडी २ची घोषणा करण्यात आली आहे. 'मेहफिल फिरसे जमेगी, हिरामंडी सिझन २ जो येणार आहे' असे हा व्हिडीओ शेअर करत इन्स्टाग्रामवर लिहिण्यात आले आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे. काहींनी हार्ट इमोजीचा वापर केला आहे. तसेच आदिती राव हैदरीने देखील कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे. पण पहिल्या सिझनमध्ये बिब्बोजानचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे सिझन २ मध्ये आदिती राव हैदरी असणार की नाही याविषयी सर्वांना प्रश्न पडला आहे. तसेच हा सिझन कधी प्रदर्शित होणार याविषयी देखील माहिती समोर आलेली नाही.
वाचा: दाक्षिणात्य अभिनेत्याने शेजारी उभ्या असलेल्या अभिनेत्रीला दिला धक्का, Viral Videoने वेधले सर्वांचे लक्ष

प्रेक्षकांनी केली विनंती

नेटफ्लिक्सने हिरामंडी २ची घोषणा करताच नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एका यूजरने 'शर्मिन सेगलला घेऊ नका' असे म्हणत कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने नेटफ्लिक्सचे खूप आभार असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजकरने 'ताजदार आणि बिब्बोजान शिवाय हिरामंडी असणार का?' असा प्रश्न विचारला आहे. चौथ्या एका यूजरने थेट 'आमलजेबचा मृत्यू पहिल्याच एपिसोडमध्ये पाहायचा आहे' असे म्हटले आहे.
वाचा: मावळ्याच्या घोड्याचा आणि कुणब्याच्या बैलजोड्याचा नाद करायचा नाही; "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील"चा ट्रेलर प्रदर्शित

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग