संजय लीला भन्साळी यांनी यावर्षी 'हीरामंडी' या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले. या वेब सीरिजमध्ये बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींनी का केले आहे. या सीरिजला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. आता सर्वजण 'हीरामंडी'च्या दुसऱ्या भागाची वाट पाहात आहेत. अभिनेत्री मनीषा कोईरालाहिने संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी २ बद्दल अपडेट दिले आहे. सीरिजच्या पुढच्या भागाचे चित्रीकरण कधी सुरू होऊ शकते हे सांगितले आहे. हीरामंडीमध्ये मनीषा कोईरालाने मलिकाजानची भूमिका साकारली होती.
इंडिया टुडेशी खास बातचीत करताना मनीषा कोईरालाने 'हीरामंडी' या सीरिजविषयी वक्तव्य केले आहे. 'हीरामंडी 2 चे शूटिंग पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये सुरू होऊ शकते. पुढील वर्षी चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. आम्ही सगळे परत एकत्र येण्याची वाट पाहात आहोत' असे मनीषा म्हणाली. या संभाषणादरम्यान मनीषाला विचारण्यात आले की, 'हीरामंडी' प्रदर्शित झाल्यानंतर तिला काही ऑफर आल्या का? या प्रश्नाचे उत्तर देताना मनीषा म्हणाली की, हो.. काही स्क्रीप्टचा मी विचार करत आहे. पण प्रोजेक्ट फायनल झाल्यानंतरच ती याबद्दल बोलेल.
यावेळी मनीषा कोईरालाने आपल्या इंडस्ट्रीतील प्रवासाविषयीही सांगितले. तीस वर्षांपूर्वी अनेकांना असे वाटत होते की, चित्रपटसृष्टी नकारात्मकतेने भरलेली आहे. त्यावेळी 'चांगल्या घरातील मुलींना' चित्रपटसृष्टीत येणं अवघड होतं. त्यावेळी पत्रकारितेमुळे अनेकदा खोटी नकारात्मकता येत होती, त्यामुळे नवीन लोकांना आपली जागा निर्माण करण्यात अडचणी येत होत्या असे मनीषा म्हणाली.
वाचा: 'करण-अर्जुन'मधील बिंदिया सध्या काय करते? १९९३ साली टॉपलेस फोटोशूटमुळे होती चर्चेत
हीरामंडीचा पहिला सीझन १ मे रोजी प्रदर्शित झाला होता. या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, ऋचा चड्ढा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख, शर्मीन सेहगल, फरदीन खान, ताहा शाह बदुशाह, अध्ययन सुमन, शेखर सुमन आणि जेसन शाह यांसारखे अनेक कलाकार होते.