Aai Kuthe Kay Karte Actress Radhika Deshpande: मनोरंजन जगतात काम करणाऱ्या कलाकारांना अनेक वेळा वैयक्तिक आयुष्यात अडचणी आणि वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. पूर्वी कलाकार या सर्व गोष्टी गुप्त ठेवत होते, मात्र आजकाल अनेक अभिनेत्री स्वतः सगळ्यांसमोर येऊन त्यांचे वाईट अनुभव शेअर करत आहेत. यापैकी एक मराठी अभिनेत्री राधिका देशपांडे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत राधिकाने अरुंधतीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. राधिका देशपांडेने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत १६ वर्षांच्या वयात तिला ट्रेनमध्ये आलेल्या वाईट प्रसंगाची आपबिती सांगितली.
राधिका देशपांडेने 'आरपार' या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिच्या जीवनातील एक खूपच वाईट अनुभव शेअर केला. ती म्हणाली, ‘मी १६ वर्षांची होते आणि ट्रेनमधून प्रवास करत होते. त्यावेळी मी वरच्या बर्थवर बसले होते. अचानक एक व्यक्ती माझ्याशी वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा माझ्या बरोबर माझा भाऊ कल्याण आणि लहान बहीण होती. आम्ही तिघे अहमदाबादला नृत्याचे कार्यक्रम करून परत येत होतो. त्यावेळी त्या व्यक्तीने मला नको तिथे स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.’
राधिका म्हणाली, ‘माझ्या डोक्यात पहिल्यांदा असा विचार आला की, मीच झोपेत आहे, पण काही वेळाने लक्षात आलं की, हे माझ्यासोबत काहीतरी विचित्र घडत आहे. त्यावेळेस मी त्याचा हात पकडला आणि त्या बोगीतून खाली उतरले. त्यानंतर मी खूप तमाशा केला. रात्रभर मला शांती मिळत नव्हती. ते दोघे माझ्या समोर बसले होते. दोघेही घाबरले होते. मला ते सहन करणे खूप कठीण झाले होते. एकाच वेळी माझ्या मनात अनेक प्रश्न आले की, 'कशासाठी हे घडले?', 'मी एकटीच का प्रवास करत होते?', 'आई-बाबांनी एकटीला का सोडलं?' अशा विविध विचारांनी मला बेचैन झालं होतं.’
राधिका म्हणाली, ‘दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या भावाला उठवले आणि त्याला संपूर्ण प्रसंग सांगितला. तो १२-१३ वर्षांचा होता, आणि माझी बहीण त्याहूनही लहान होती. मी त्याला सांगितलं की, कल्याण, मी त्याला आता झापड मारणार आहे, आणि त्यानंतर तू देखील त्याला मार. आम्ही तेच केलं. त्यानंतर गाडीतील काही लोकं आम्हाला शांती ठेवण्यास सांगत होते. त्यानंतर टीसी आला आणि त्यांनी दोघांना खाली उतरवलं आहे. त्यानंतर माझ्या मनाला शांतता मिळाली आणि मला एकदम हलकं वाटलं. त्या व्यक्तीला योग्य शिक्षा मिळाली.’